शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मांस नष्ट करायला गेले अन् टेम्पो बदलून आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:04 IST

आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : आष्टी पोलिसांचा गलथानपणा चव्हाट्यावर

बीड / कडा : आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांस नष्ट करायला नेल्यानंतर अवघ्या तासाभरात हा ‘चेंज’ झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना कत्तलखाना चालतो. याच ठिकाणी प्राण्यांची कत्तल करून मांसाची परराज्यात विक्री केली जाते. हीच माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिली होती. त्यानंतर छापा टाकून चार टन मांसाने भरलेला टेम्पो (एमएच ४२ एक्यू ९८२५) जप्त केला होता. याप्रकरणी पोउपनि सागडे यांच्या फिर्यादीवरून आमिर बाबुराव शेख, मोहमंद फारूकखान मोहमद खलील, मुजाहिर जब्बार कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, कारवाईनंतर आष्टी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मांसाने भरलेला टेम्पो जवळीच गायरानात नेला. येथे मांसाची विल्हेवाट लावली. यावेळी तपासी अंमलदार पोना केदार आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.मांस घेऊन जाताना टेम्पो एक आणि परत आणल्यावर टेम्पो वेगळाच असल्याचे समोर आले. केवळ तासाभरात ‘चेंज’ करण्याची प्रक्रिया ‘सोयीस्कर’पणे पार पाडल्याचे सांगण्यात आले.खात्रीसाठी डीवायएसपी आष्टीकडे रवानापोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले, याबाबत खात्री केली जाईल. त्यासाठी डीवायएसपींना सांगितले आहे.तर आष्टीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डॉ.अर्जून भोसले म्हणाले, याची खात्री करण्यासाठी आष्टीला जात आहे. तेथे गेल्यावरच खरा प्रकार समोर येईल.तपासी अंमलदार पोना केदार म्हणाले, मांस नष्ट केले आहे. टेम्पोत बदल झालेला नाही.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी