शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मायेचा ओलावा! पॅरालिसिस झालेल्या हरणीचे ‘सर्पराज्ञी’त बाळंतपण; पाडस सुदृढ, आई गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 19:49 IST

पॅरालिसिस झालेली ही काळविटाची मादी कामखेडा, ता. जि. बीड येथील शेतकरी काळकुटे यांच्या शेतात घायाळ अवस्थेत चार दिवसांपूर्वी आढळून आली होती.

शिरूर कासार :  सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी वनविभागाने उपचारासाठी दाखल केलेल्या एका पॅरालिसिस झालेल्या काळविटाच्या मादीने शनिवारी दुपारी एका गोंडस पाडसाला जन्म दिला. आईची प्रकृती  गंभीर असून, पाडस सुदृढ असल्याची माहिती ‘सर्पराज्ञी’च्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली. देशात वन्यजीवांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात एका पॅरालिसिस झालेल्या हरणीचे (काळवीट) पहिले बाळंतपण झाले, हे विशेष!  तसंही पहिलं बाळंतपण हे माहेरीच, असा अलिखित नियमच आहे निसर्गाचा.

पॅरालिसिस झालेली ही काळविटाची मादी कामखेडा, ता. जि. बीड येथील शेतकरी काळकुटे यांच्या शेतात घायाळ अवस्थेत चार दिवसांपूर्वी आढळून आली होती. या घटनेची माहिती तेथील युवक सचिन मस्के यांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनविभागाच्या वनरक्षक पवार व राजेंद्र कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन या काळविटाच्या मादीस ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी विभागीय वनअधिकारी अमोल  गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली या काळविटाच्या मादीस तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. सर्पराज्ञीत उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही काळविटाची मादी गर्भवती असल्याचे सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या लक्षात आले. त्यानंतर या हरणीवर योग्य ते उपचार  सुरू करण्यात आले. 

पाडस सुदृढ, आई गंभीरशिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात  ८ जून रोजी हरणीने एका गोंडस पाडसाला जन्म दिला. हे पाडस सुदृढ असून, आईची तब्येत मात्र गंभीर असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे व सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.

आतापर्यंत ३०० प्राण्यांचे बाळंतपण२४ वर्षांपासून कार्यरत सर्पराज्ञी केंद्रात आतापर्यंत ३०० प्राण्यांचे बाळंतपण सुखरुप झाले आहेत.  अर्धी पोटात, अर्धी बाहेर अडविलेली काळवीट मादी, १५० ते २०० सर्प व अन्य वन्यजीवांचे बाळंतपण झाले आहे. तरस आणि खोकडाचे सीझरही येथे करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Beedबीडforestजंगल