शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माताबाळ मृत्यू प्रकरण;पोलिसांचे १२ प्रश्न, समितीने डॉक्टर दाम्पत्य दोषी असल्याचा दिला निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:58 IST

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले.

बीड : माजलगावातील सोनाली गायकवाड या मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर जाजू दाम्पत्याचा निष्काळजीपणा झाला आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून १२ प्रश्न विचारले होते. यात चार वगळता सर्वच ठिकाणी नकारात्मक अहवाल गेला. त्यामुळेच या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच वेळीच स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ उपलब्ध झाले असते तर मातेचा जीव वाचला असता, असा निष्कर्षही समितीने दिला आहे.

माजलगावातील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. यात रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष शहाणे, पाटाेद्याचे डॉ. सदाशिव राऊत व माजलगावचे डॉ. सुभाष बडे यांचा समावेश होता. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले. सोनाली यांना पहाटे चार वाजता झटका आला होता, तेव्हा प्रसूतीसाठी प्रगती झालेली नव्हती. हे पाहून लगेच तिचे सीझर अथवा पुढील संस्थेत पाठविणे आवश्यक होते. परंतु असे केले नाही. बाळाचे वजन साडेतीन केलो आहे हे माहिती असतानाही बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बोलावले नाही. प्रसूती गुंतागुंतीची झाल्याचे माहिती असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नाही. या सर्वांमध्ये हलगर्जी झाल्यानेच मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे हे डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले असून गुन्हा दाखल झाला.

स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. काकांनीही अडचणीतयाच रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ऑन कॉल म्हणून डॉ. सुनंदा काकांनी या होत्या. त्यांनी महिलेला तपासून पुढे पाठविण्यासह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जाजू दाम्पत्याला दिल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता दाम्पत्याची शस्त्रक्रिया करण्याइतपत पदवी झालेली नाही. तसेच स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही आणि सर्व गुंतागुंत माहिती असतानाही दुसऱ्यांना सल्ला का दिला, स्वत:च शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव का नाही वाचवला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या या जबाबामुळे डॉ. काकांनी यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.

दाम्पत्य अटकेत असल्याने बैठक पुढेसोनालीच्या मृत्यूमधील गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी दुपारी माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक बोलावली होती. परंतु डॉ. जाजू दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असल्याने आणि ते समोर उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सर्व माहिती घेतली. तसेच पाेलिसांनी आम्हाला १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्यासाठी तीन वैद्यकीय अधीक्षकांच्या समिती नियुक्त केली होती. चौकशी करूनच पोलिसांना अहवाल दिला. समितीच्या अहवालानुसार डॉ. जाजू दाम्पत्य हे दोषी असल्याचे सिद्ध होते. तसेच स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नसतानाही आणि प्रसूती गुंतागुंतीची झालेली आहे, हे माहिती असतानाही काहीच उपाययोजना न केल्याचे मतही समितीने नाेंदविले आहे.डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर