शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:34 IST

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खावी लागली. या प्रकरणात आईने पैशाच्या लोभापायी मुलीचे उज्ज्वल भवितव्य उद्ध्वस्त केल्याचा ...

ठळक मुद्देसूत्रधारासह पाच जण न्यायालयीन कोठडीत

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खावी लागली. या प्रकरणात आईने पैशाच्या लोभापायी मुलीचे उज्ज्वल भवितव्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पैशाचा मोह कोणाला काय करण्यास भाग पाडेल, हे सांगता येत नाही. पैशाच्या हव्यासापायी नाती गोतीही माणसे विसरत चालली आहेत. ज्या आईने जन्म दिला, त्याच आईने पैशासाठी आपल्या मुलीचा खोटा विवाह करत आपल्याच मुलीचे भवितव्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार केजमध्ये उघडकीस आला.केज शहरातील क्रांतीनगर भागातील एक महिलेला तिच्याच मुलीचे खोटे लग्न लावण्यासाठी मीनाक्षी पोहरे हिने पैशांचे आमिष दाखवले. खोटे लग्न लावून देणाºया टोळीची मीनाक्षी सूत्रधार आहे. या महिलेने तीस हजार रुपये घेत मुलीचे खोटे नाव सांगून तिचा विवाह लावून दिला. तिच्यासोबत असलेल्या मावशीने लग्नाच्या तिसºया दिवशी नववधूच्या वडिलांना दवाखान्यात दाखल केल्याचा बहाणा करून बीड येथे येत साथीदाराच्या मदतीने भाचीसह पोबारा केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार नवरदेवाने केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी करत या टोळीची सूत्रधार मीनाक्षी पोहरे व तिच्या दोन साथीदारास अटक केल्यानंतर या खोट्या लग्नाचे धागेदोरे केजपर्यंत पोहोचले व केज शहरातील क्रांतीनगर भागातील या महिलेस अटक केली.

फसवणूक केल्या प्रकरणी तिला व तिच्या कृत्यात सहभागी असलेल्या मुलीस शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी बेड्या ठोकून गंगापूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघींसह या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचही जणांची न्यायालयीन कोठडी सुनावत हर्सूल कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाmarriageलग्नMarathwadaमराठवाडा