शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकप स्पर्धेतील कामाने मस्साजोग झाले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:56 IST

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस ऐन दुष्काळात पंधरा फुटांवर पाणी  

ठळक मुद्देसरपंच अश्विनी संतोष देशमुख यांनी गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गावाची नोंद केली.श्रमदानासाठी गावातील २७० महिला दररोज श्रमदानात सहभागी होत असत.

- दीपक नाईकवाडे

केज (जि. बडी) : गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गाव शिवाराच्या चोहोबाजूने माथा ते पायथ्यापर्यंत ग्रामस्थांनी श्रमदानासह यंत्रकामातून केलेल्या कामामुळे केज तालुक्यातील मस्साजोग हे गाव पाणीदार झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतही मस्साजोगला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसिंचनच्या विहिरीस पंधरा फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

सरपंच अश्विनी संतोष देशमुख यांनी गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गावाची नोंद केली. गावात काय कामे करावयाची आहेत, याचे शास्त्रशुद्ध पध्दतीचे प्रशिक्षण गावातील धनंजय देशमुख, अमोल बनसोड, किरण सोनवणे या तिघांनी घेतले. नंतर वॉटरकप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कालावधीत काय कामे करायची याचेही नियोजन केले. 

वॉटरकप स्पर्धेच्या कामासाठी श्रमदानात गावातील महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला. श्रमदानासाठी गावातील २७० महिला दररोज श्रमदानात सहभागी होत असत. यात दीडशे पुरु षांसह मुलांनीही श्रमदान केले. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला. मात्र वाहून जाणारे पाणी वॉटरकपच्या कामामुळे गावाच्या शिवारातच मुरले. परिणामी या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळातही गावातील हनुमान मंदिराजवळच्या हातपंपास एकदा हापसल्यावर एक लिटर पाणी येते, तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसिंचनच्या विहिरीस अवघ्या पंधरा फुटांवर पाणी आहे. तलावातील विहिरीसही पंधरा फुटांवर पाणी आहे. ही सर्व किमया मस्साजोग ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदानातून केलेल्या कामामुळे झाली आहे.  

नेमके काय केले?मस्साजोग गावच्या १५४५ हेक्टर शिवारात गावच्या चोहोबाजूने माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून ८ हजार १०० घनमीटर काम केले. यामध्ये कंपार्टमेट बंडीग, मातीनाला बांध, एलबीएफ (लुज बोल्डर स्टक्चर) आदी कामे केली गेली.यंत्राद्वारे  नाला खोलीकरण व रु ंदीकरण, छोटे ओढे खोलीकरण व रुंदीकरण,  नदी खोलीकरण व रूंदीकरण यासह गावाजवळील धनगर वस्तीवरील पाझर तलावातील गाळ काढून यंत्राद्वारे १ लाख २८ हजार १८३ घनमीटरचे काम करण्यात आले. या सोबतच सात शेततळे खोदण्यात आली. यामधील पाच शेततळे हे इनलेट आउटलेटचे तर दोन इनलेट आउटलेट विरहित कपड्याचे करण्यात आले. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीBeedबीड