शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
3
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
4
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
6
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
7
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
8
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
9
मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का, दुखापतीमुळे आणखी एक खेळाडू स्पर्धेबाहेर!
10
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
11
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
12
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
13
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
14
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
15
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
18
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
19
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त

By सोमनाथ खताळ | Updated: January 13, 2025 21:47 IST

नवीन स्थापन, बसवराज तेली कायम : आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीतील अधिकाऱ्यांचे फोटो खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत दिसले होते. त्यानंतर त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे जूनी एसआयटी बरखास्त करून नवीनची स्थापना केली आहे. यामध्ये आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश आहे. उप महानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम राहणार आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. सत्ताधारी, विरोधी आमदारांनी यावर आवाज उठविल्यानंतर हत्यासह दोन कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याप्रमाणे १ जानेवारीला उप महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. यात बीड जिल्ह्यातीलच अधिकारी, कर्मचारी घेण्यात आले होते. तेली यांनी तपासाला सुरूवात करत आरोपींची चौकशीही केली होती.

अशातच एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत फोटो व्हायरल झाला. त्यानंतर यावर सर्वांनीच आक्षेप घेतला. एसआयटीतील अधिकाऱ्यांचेच आरोपींसोबत संगणमत असल्यास न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत ती बदलण्याची मागणी केली जात होती. याच अनुषंगाने आता जुनी एसआयटी बरखास्त करून नवीनच स्थापना केली आहे. भाजपचे आ.सुरेश धस यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांना याबाबत माहिती दिली.बीड पोलिसांवर अविश्वास?

मागील काही दिवसांपासून बीड पोलिस वादात सापडत आहेत. आ.सुरेश धस यांनी परळीत ओरीजनल पोलिसच राहिले नाहीत. तेथे सीआयडी, सावधान इंडियातील कलाकार आणा, असे म्हणत संशय व्यक्त केला. खा.बजरंग सोनवणे यांनीही सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपासावर प्रश्न उपस्थित केला. तर एलसीबी सारख्या महत्वाच्या गुन्हे अन्वेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे बीड पोलिस वादात सापडत आहेत. तसेच त्यांच्यावर अविश्वास दाखविला जात आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनीही पोलिसांवर निशाणा साधला आहे.नव्या एसआयटीत कोण?

किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

जुने पथकात कोण होते?

अनिल गुजर - पोलीस उपअधीक्षक, सीआयडी बीड

विजयसिंग शिवलाल जोनवाल स.पो. निरीक्षक, एलसीबी बीडमहेश विघ्ने - पोलिस उपनिरीक्षक, एलसीबी बीड

आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक, केजतुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक, एलसीबी बीड

मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार, एलसीबी बीडचंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक, केज

बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक, केजसंतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई, केज

आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची धाव

धनंजय देशमुख यांनी सकाळी आंदोलन केल्यानंतर सायंकाळी सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांची भेट घेतली. तपासाबाबत जी माहिती हवी होती, त्याबाबत त्यांना लेखी दिल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसेच मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तपास कुठपर्यंत आला आहे, हे बसवराज तेली सांगणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मंगळवारी होणारे आंदोलन थांबविण्याची विनंती केली आहे. तपास योग्य चालू आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असा विश्वास अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच सीआयडी व पोलिस अधीक्षकांना सरकारच्यावतीने फोन झाला. मी तपासाबाबत समाधानी आहे किंवा नाही, हे तेली यांना भेटून नंतरच सांगेल, असेही देशमुख म्हणाले. सोमवारी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिस