शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले, आता अपघातात मृत्यू; केज - धारूर रस्त्यावर टँकरने दुचाकीस्वाराला चिरडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 23:33 IST

धारूर-केज रस्त्यावर दुचाकीस्वाराला इथेनॉल टँकरने चाकाखाली चिरडले

धारूर (बीड): धारूर-केज राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ सोमवारी रात्री सुमारे आठ वाजता झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंगद लांडगे (वय २७, रा. पिसेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अंगद लांडगे हे केज येथील एका दुकानात मॅनेजर पदावर कार्यरत होते. दुकानाच्या उधारी वसुलीसाठी ते धारूर येथे आले होते. काम आटोपून दुचाकीवरून परत जात असताना टोलनाक्याजवळ अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या इथेनॉल टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, या युवकाचे केवळ आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर इथेनॉल टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात