शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:00 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानं गळफास घेऊन केली आत्महत्या, सातवी आत्महत्या...

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख (वय 35 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजित देशमुख यांनी मंगळवारी (31 जुलै) सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे. दरम्यान, संबंधित चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का?, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले.

विज्ञाना विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होते. त्यांच्यासह कुटुंबीयांवर बँकेचे कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची बाब त्यानं मित्रांकडे व्यक्त केली होती. शिवाय, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी अभिजित यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

 

 

सरकारला २४ तासांचा अल्टिमेटमशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत 7 तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यभर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी औरंगाबादला केली. पाटील म्हणाले की, काहीजण राजकीय लाभासाठी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. आजपर्यंत पाच समाजबांधव आमच्यातून गेलेत. मराठा क्रांती मोर्चा सरकारला सात मुद्द्यांचा ‘फॉर्म्युला’ देत आहे. राज्यमागास आयोगाला अहवाल देण्यासाठी तातडीने विनंतीपत्र किंवा आदेश द्यावेत. पत्राची तारीख जाहीर करावी. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश काढण्याची तारीख जाहीर करावी, आयोगाचा अहवाल पूर्ण स्वीकारणार किंवा शिफारशी अंशत: स्वीकारणार, हे लगेच स्पष्ट करावे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीडSuicideआत्महत्या