शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 19:09 IST

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली.

माजलगाव- आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थांनी भेट देउन पाहणी केली. जाळपोळ, तोडफोड हल्ला प्रकरणी दोषींवर निश्चीतच कारवाई होणार असून या जाळपोळप्रकरणी चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंडेंनी सांगितले.

आ. सोळंके यांच्या निवासस्थांनी आज(रविवार) सायंकाळी ५ वाजता मुंडे यांनी भेट दिली. तसेच, पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली. सोळंके यांच्या निवासस्थांनी बोलताना मुंडे म्हणाले की, हल्ला प्रकरणातील दोषींवर कारवाई निश्चीत होणार. स्थानिक पोलिस व प्रशासनाने मात्र हल्ला घडतेवेळी जमावाला नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते. नियंत्रण ठेवले असते तर पुढील अनर्थ टळला असता. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी हे राजकीय षडयंत्र असून अवैध धंदेवाले व धान्याचा काळा बाजार करणारे हल्यामागे असल्याचा आरोपही केला. यावेळी अमरसिंह पंडित, विरेंद्र सोळंके, जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे,सुशील डक उपविभागीय अधिकारी निलम बाफणा, तहसिलदार वर्षा मनाळे उपस्थित होते.तहसीलदारांना झापले....

आमदार सोळंके यांनी शहरातील शासकीय धान्यमाफीया, वाळू माफिया यांच्याबाबत मी चार वेळा तक्रार केली होती, परंतु तहसीलदार यांनी यावर काहीच कारवाई केली नाही, असे सांगितले. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तहसीलदार वर्षा मनाळे यांना सांगितले की, तुम्ही जर लोकप्रतिनिधीचे ऐकत नसाल तर तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते, याबाबत तुम्हाला माहिती नाही का ? या धंद्यांवर तात्काळ कारवाई करा असेही यावेळी तहसीलदार यांना सुनावले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडPrakash Solankeप्रकाश सोळंकेMaratha Reservationमराठा आरक्षण