शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

Maratha Reservation : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:54 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात सहा जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविले आहे.

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात सहा जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविले आहे. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी पत्र संबंधित कुटुंबाला दिले आहे.

एकनाथ सुखदेव पैठणे (रा. कांबी मजरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पैठणे यांचा आरक्षणासंदर्भातच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग होता. बुधवारी सकाळी सिरसदेवी येथून काढलेल्या रॅलीतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, एकनाथ पैठणे यांचा मुलगा कृष्णा याच्या जवाबावरुन ही आत्महत्यामराठा आरक्षणासाठी झाल्याचे सांगण्यात आले. 

दिगांबर माणिक कदम (३५ रा.पाटेगाव) यांनीही बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.  बुधवारी आई- वडील व पत्नी शेतात होते. सायंकाळी घरात आडूला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. रात्री कुटुंबीय शेतातून परतल्यावर त्यांना हा प्रकार दिसला. कदम यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी येथे भेट दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

प्रशासनाकडून मदतीचे लेखी पत्रप्रशासनातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने कदम व पैठणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यांच्या माहितीवरून त्यांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान व कुटुंबातील सदस्याला तातडीने नौकरीवर घेण्याचे लेखी पत्र दिले.

जिल्ह्यात सहावी आत्महत्यामराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सहा जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. बीड तालुक्यात ३, पाटोदा, गेवराई व केज तालुक्यात प्रत्येकी एक अशा आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्या