शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:52 IST

मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली

बीड : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली. परळी येथील तहसील कार्यालय परिसरात मागील १६ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची आज दुपारी एक बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वयकांनी आंदोलनाच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाल्याचे लेखी द्यावे तेव्हाच आंदोलन स्थगित करण्यात येईल अशी भूमिका आंदोलकांनी जाहीर केली. तसेच ७ ऑगस्ट पर्यत सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ९ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला. 

मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घ्यावेत मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांची उपसमिती बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व निर्णय घ्यावीत अशी मागणीसुद्धा यावेळी आंदोलकांनी जाहीर केली. 

समाजातील जेष्ट चर्चा करतील मराठा क्रांती ठोस मोर्चाचे समन्वयकांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. मात्र या प्रश्नी आता राज्यातील सर्व आमदार आणि मराठा समाजातील जेष्ट यांनीच सरकारशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे आंदोलकांनी स्पष्ट केले.

बैठकीतील निर्णय :१. शासकीय व निमशासकीय मेगा भरती आरक्षण जाहीर झाल्यास करावी २. आरक्षणाबद्दल कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा ३. आंदोकांवरील गुन्हे मागे घ्यावीत 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन