शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:01 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी एका २० वर्षीय युवकाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी एका २० वर्षीय युवकाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथे घडली. जिल्ह्यात यापूर्वीच सहा जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविलेले आहे.

राहुल पद्माकर हावळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुलचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना अडीच एकर जमीन आहे. राहुल हा त्यांना एकुलता एक मुलगा होता. उच्च शिक्षण घेऊन त्याला बी. फार्मसी करायची होती. मात्र, मराठा समाजाला आरक्षण नसल्याने बी. फार्मसीला त्याचा क्रमांक लागला नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता, असे त्याचा चुलत भाऊ विकास रामहरी हावळे याने पोलिसांना दिलेल्या जवाबात नमूद आहे. यातूनच त्याने ११ आॅगस्ट रोजी सकाळी राहत्या घरीच विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनी त्याला नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज सकाळी ७.१५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, राहुलच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह घरातील एका सदस्यास शासकीय नौकरी द्यावी यासाठी नातेवाईकांसह समाजबांधवांनी जिल्हा रुग्णालय चौकीसमोर ठिय्या मांडला. त्यानंतर तात्काळ उप विभागीय अधिकारी विकास माने, पो. नि. सय्यद सुलेमान यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रशासनाच्या वतीने मदतीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.  विकास हावळे यांच्या खबरीवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्याBeedबीड