शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत मराठ्यांचा जागर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:50 IST

एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली.

अंबाजोगाई : एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली. या गोंधळात मराठा तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंत सर्व जबाबदारी तरुणांनी यशस्वीरीत्या आणि अंबाजोगाईच्या परंपरेला साजेशी पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.

अतिशय शांततेत आणि शिस्तीचे प्रदर्शन घडवीत ५८ मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांवर विचार होत नसल्याने मागील महिन्यापासून क्रांती मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाले आहे. गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले. राज्यात आगडोंब उसळला, नंतरही अनेक  आत्महत्या झाल्या. याचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांनी आज जागर गोंधळ आयोजित केला होता. 

यानिमित्ताने आयोजित रैलीत हजारो तरुणांनी सहभाग नोंदविला. नगर परिषद कॉम्प्लेक्सपासून या रैलीस सुरुवात झाली. पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. 

यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षणाबाबत संथ भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. यावेळी मुस्लीम समाजातर्फे आंदोलाकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह संपूर्ण वेळ आंदोलनकर्त्यांसोबत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले. 

काय आहेत मागण्या?मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार