शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 08:12 IST

Rain In Beed : पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले.

ठळक मुद्देशनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 100 टक्के भरले.धरणात सध्या 62 हजार 517 क्युसेक पाण्याची आवक  आहे. 

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : येथील माजलगाव धरण ( Majalgaon Dam ) क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस ( Rain In Beed ) पडत असल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सोमवारी पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून सिंदफना पात्रात 62 हजार क्युसेक ऐवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ( Majalgaon dam 100 percent full; Discharge of 62,000 cusecs of water by opening 11 doors)

माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच  पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील 2 दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली.  हे धरण सोमवारी पहाटे  पुर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला. धरणाची पाणी पातळी 431.80 मीटर ऐवढी आहे .शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 100 टक्के भरले. यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले.  धरणात सध्या 62 हजार 517 क्युसेक पाण्याची आवक  आहे.  तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली.

दरम्यान, माजलगांव धरण शंभर टक्के भरल्याने सिंधफना नदीत मोठ्याप्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे सांडस चिंचोली या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला.

Majalgaon Dam  :               

Date:-6/9/ 2021                            Time: - 7:00

1) Water level:-  431.80

2) Gross  storage=454.00/454.00 Mm3.

3) Live storage: - 312.00/312.00 Mm3 

4) Percentage. 100%

5)  inflow :-  62517 cusecs                       

6)No of spillway gate 0pened  = 11  gate  (1.50 m)     

7) Discharge Through gate = 1770.263/ 62517cuse

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड