शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता सामान्य मराठा समाजाची नसून फक्त १६९ घराण्यांच्या हातात आहे. हे मंत्री, आमदार, खासदार, पाहिले तर सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही घराणेशाही मोडीत काडण्याची गरज असल्याचे सांगून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.शनिवारी बीड येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संवाद निर्धार’ या जाहीर सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी.आ. हरीभाऊ भदे, बबन वडमारे, शेख निजाम, सचिन माळी, किसन चव्हाण, मुफ्ती कामेद, डॉ. इंदरकुमार भिसे, विष्णू देवकते, अमीत भुइंगळ, गंगाभीषण थावरे, सुशीला मोराळे, शीतल साठे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपच्या हातात दुसऱ्या वेळी सत्ता दिली मात्र त्यांना सरकार चालवता येत नाही. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना जोपासण्याचे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडवायला सरकारकडे पैसा नाही. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेही दगलबाज आहेत. नोटाबंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी बँकामधून भाजप दलालांच्या माध्यमातून ४० टक्के प्रमाणे रक्कम देऊन हा पैसा पांढरा केला आहे. हाच पैसा मतदारांना खरेदी करण्यासाठी वापरला जातोय, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले. नदीपात्रात घेतलेल्या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.क्षीरसागरांची भांडणं फक्त लोकांना दाखवण्यासाठीसंदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील भांडणं ही लोकांना दाखवण्यासाठी आहेत. तसेच इतर पर्याय उपलब्ध होऊ नये यासाठी ही नाटकं केली जात आहेत, सत्तेसाठी क्षीरसागर काहीही करु शकतात अशी टीका एएमआयएमचे जिल्हाअध्यक्ष शेख निजाम यांनी केली.

टॅग्स :BeedबीडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस