शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:30 IST

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा येथे बुधवारी रात्री घडली. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी पत्र संबंधित कुटुंबाला दिले आहे.एकनाथ सुखदेव पैठणे (रा. कांबी मजरा) ...

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा येथे बुधवारी रात्री घडली. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी पत्र संबंधित कुटुंबाला दिले आहे.

एकनाथ सुखदेव पैठणे (रा. कांबी मजरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पैठणे यांचा आरक्षणासंदर्भातच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग होता. बुधवारी सकाळी सिरसदेवी येथून काढलेल्या रॅलीतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, एकनाथ पैठणे यांचा मुलगा कृष्णा याच्या जवाबावरुन ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान व कुटुंबातील सदस्याला तातडीने नौकरीवर घेण्याचे लेखी पत्र दिले.

जिल्ह्यात पाचवी आत्महत्यामराठा आरक्षणासाठी आतापर्यंत पाच जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. बीड तालुक्यात २, पाटोदा व केज तालुक्यात प्रत्येकी एक अशा चार आत्महत्या यापूर्वी झालेल्या आहेत. आतापर्यंत पाच आत्महत्यांची नोंद शासन दरबारी झाली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद