शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार

By सोमनाथ खताळ | Updated: October 28, 2024 10:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : बीड आणि आष्टी मतदारसंघांमधून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले असले तरी महायुतीकडून अद्यापही उमेदवार देण्यात आलेले नाहीत.

Maharashtra Assembly Election 2024 : बीड : राज्याचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत धनंजय मुंडे यांच्याविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आलेल्या राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

येथून काही ओबीसी नेते इच्छुक असतानाही पवारांनी परळीत मराठा चेहरा म्हणून देशमुखांना उमेदवारी दिली, तर माजलगावातून दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रमेश आडसकरांना ‘हाबाडा’ देत मोहन जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीड आणि आष्टी मतदारसंघांमधून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले असले तरी महायुतीकडून अद्यापही उमेदवार देण्यात आलेले नाहीत. 

गेवराईत काका-पुतण्या लढतगेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे बदामराव पंडित आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या पंडित काका-पुतण्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवारही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

माजलगावात आडसकर करणार बंडखोरीभाजपचे नेते रमेश आडसकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता आडसकर बंडखोरी करण्याची दाट शक्यता आहे. 

आष्टीत विद्यमान आमदार वेटिंगवरच - आष्टीत महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आ. बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आ. भीमराव धोंडे आणि सुरेश धस इच्छुक आहेत. त्यामुळे येथून उमेदवारी दिलेली नाही. अशीच परिस्थिती बीडमध्ये आहे. येथील जागेवर शिंदेसेना दावा करत असून, जिल्हाप्रमुख अनिल जगताप इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून डाॅ. योगेश क्षीरसागर इच्छुक असून, त्यांच्यासाठी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी ताकद लावली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Beedबीडmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed-pcबीड