शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 08:14 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले.

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली. परळीतून धनंजय मुंडे यांना 1,21,555 एवढी मतं मिळाली असून, पंकजा मुंडेंना 91,031 मतांवर समाधान मानावं लागलं. धनंजय मुंडेंनी जवळपास 30,524 मताधिक्यानं पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना अनाकलनीय असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही टाकली आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेनही. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच. तो अंतिम असतो बस्स!!, ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!, मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा". या राजकारणात मी यशस्वी होणं हाही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं. 19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच 21 तारखेला सकाळी बाहेर पडले.माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले. गोपीनाथ गड येथे मध्ये साहेबांचे दर्शन घेतले आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले. मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील, पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं नाही’हे शत्रूही कबूल करेल. या पोस्टच्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही, पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं...’, विश्वास ठेवा मी 'त्या 'क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हेही नक्की. इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो. मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला, मीडिया ही गेला होता. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे. त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं. मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे. निकालाची जबाबदारी फक्त माझी आहे, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळी