शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महादेव मुंडे खून प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचे कुटुंब, नातेवाईकांसह उपोषण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:30 IST

१६ महिन्यांनंतरही आरोपींना अटक नाही; ज्ञानेश्वरी मुंडे, मुंडे कुटुंब आणि कन्हेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक उपोषणात सहभागी

- संजय खाकरे

बीड/ परळी: परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणास 16 महिने उलटले असताना ही मारेकरी मोकाटच आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे परिवाराच्या वतीने आजपासून ( दि.३ ) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

महादेव मुंडे यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्यांचा मृतदेह परळीच्या तहसील कार्यालयासमोरील जागेत 22 ऑक्टोबर 2023 रोजी आढळून आला. याप्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अद्यापही एका आरोपीसही अटक करण्यात आलेले नाही. 16 महिन्यानंतरही आरोपी अटक नसल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आष्टीचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली व मुंडे कुटुंबाचे सांत्वन केले. 

१६ महिन्यांनंतरही आरोपींना अटक नाही, कुटुंबासह उपोषणदरम्यान, न्यायासाठी गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर मुंडे या उपोषण करणार होत्या परंतु त्यांना विनंती करण्यात आल्याने त्यांनी उपोषण लांबणीवर टाकले होते. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक न केल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तीन मार्चपासून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे, तसेच गोविंदराव फड, भगवान फड सतीश फड, तुळसाबाई फड, छाया फड यांच्यासह कन्हेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन