शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मादळमोहीत तरुणाचा, देवडीत मजुराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:28 IST

वडवणी तालुक्यातील देवडी येथे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उसतोड मजूराचा तर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जुन्या भांडणातून एका हॉटेलचालक असलेल्या तरूणाचा खून झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी / गेवराई : वडवणी तालुक्यातील देवडी येथे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उसतोड मजूराचा तर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जुन्या भांडणातून एका हॉटेलचालक असलेल्या तरूणाचा खून झाला. दोन्ही घटनांमध्ये हाणामाऱ्या झाल्या होत्या. यात मृत्यू झाल्याने खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.बाळु उर्फ आनंत निवृत्ती तळेकर (३१ मादळमोही ता.गेवराई) यांचे मादळमोही येथे हॉटेल आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली होती. जखमी तळेकर यांना तातडीने बीड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, सोमवारी सकाळी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी मृतदेह जिल्हा रूग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी गेवराई ठाण्यात भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती तळेकर याच्या फियार्दीवरून गणेश प्रताप मोटे, जगदिश भिमराव मोटे, अनिल भिमराव मोटे, शाम अनिल मोटे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे करीत आहेत. दरम्यान, मयत तळेकर याच्यावर गेवराई ठाण्यात मटका, विनयभंग, मारामाºया सारखे जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत.मध्यस्थी करणे मजुराच्या अंगलटवडवणी तालुक्यातील देवडी येथे दोघात पैश्याच्या वादातुन भांडण जुंपले. हे भांडण सोडविण्यासाठी गावातीलच शेख अजमोद्दीन शेख जैनोद्दिन (३५) हे मध्यस्थी म्हणून गेले.याच हाणामारीत शेख अजमोद्दिन यांच्या डोक्यात जबर मार लागला. यामुळे शेख हे जागीच ठार झाले.घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले. रात्री उशिरापर्यंत वडवणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करणे सुरू होते.पोलीस उप अधीक्षक श्रीकांत डिसले, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस