शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाचा खेळखंडोबा; स्वत:चे दुसरीसोबत ‘अफेअर’ अन् पत्नीवरच संशय घेत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:56 IST

गेवराई तालुक्यातील प्रकार: पुण्यावरून चकलांबा ठाण्यात गुन्हा वर्ग

बीड : २०१५ साली प्रेमविवाह झाला. नंतर दोन मुलेही झाली. परंतु, आता पतीने बाहेरची एक मुलगी घरात आणली. तिचे ऐकून प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार एप्रिल महिन्याच्या शेवटी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडला. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, तो पुण्यावरून चकलांबा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सोनम व सुनील (नाव बदलले) यांची ओळख पुण्यातील येरवडा येथे २०१५ साली झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झाले. त्यांना दोन मुलेही झाली. दोघेही गेवराई तालुक्यातील उमापूर येथे राहण्यासाठी आले. लग्नानंतर काही दिवस सुखी संसार चालल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. पण लव्ह मॅरेज असल्याने सोनमने घरी सांगितले नाही. सुनीलकडे तीन ट्रॅक्टर असून, तो ऊसतोडीचे ठेकेदारीचे काम करतो. बाहेरच्या राज्यातून मजूर आणून त्यांच्याकडून ऊसतोडीचे काम करून घेताे. सुनीलचे भोसरी येथील एका पूनम (नाव बदलले) नावाच्या मुलीसोबत सूत जुळले. हा प्रकार सोनमला तिच्या मामाच्या मुलाने सांगितला. जानेवारीमध्ये सोनमने सुनीलला याबाबत विचारणा केली. यावर त्यानेही पूनमसोबत प्रेमसंबंध असून, तिच्याशी लग्न करणार आहे. तू मला सपोर्ट नाही केला तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतरही सोनमने पतीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याच्यात सुधारणा झाली नाही.

सोनमने गाठले मध्य प्रदेशसुनील हा डिसेंबर २०२४ मध्ये मध्य प्रदेश राज्यात ऊसतोडीकरता गेला होता. त्यानंतर ३१ फेब्रुवारी २०२५ रोजी सोनमला तिच्या मामाच्या मुलाने फोन करून सुनील हा पूनमसोबत विवाह करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सोनमने मध्य प्रदेश गाठत सर्वांनाच तेथून उमापूरला आणले. पूनमलाही त्याच घरात ठेवले. २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पूनमने सुनीलचे कान भरले. सोनमचे पुण्यातील एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचे सांगितले. यावर सुनीलने कसलीही खात्री न करता सोनमला स्टीलच्या राॅडने पाठीवर, उजव्या हाताच्या दंडावर, उजव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली. तसेच मंगळसूत्र, कानातले बुगडे व इतर स्त्रीधन काढून घेतले. त्यानंतर सोनम गेवराईहून पुण्याला आईकडे निघून गेली. तेथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा चकलांबा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड