शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिरुर कासार तालुक्यातील तागडगावात भगवानबाबांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:58 IST

शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देमावशीच्या गावात ८५ व्या नारळी सप्ताहास सुरूवात; धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. मावशीच्या गावात संत भगवानबाबांच्या जयजयकाराने उथळा परिसर दुमदुमुन गेला होता.प्रथम देव घरात कलश व प्रतिमापूजन सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर व्यासपीठावरून मान्यवरांनी बाबांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. नामदेव शास्त्रींच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम होत होते. व्यासपीठावर सर्व मान्यवरांसह शास्त्रीजी उभेच होते. नंतर श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परंपरेप्रमाणे मानाचे टाळकरी व महाराज मंडळी आणि गडावर अध्यापक असलेले नारायण स्वामी या सर्वांच्या हस्ते टाळ, वीणा, मृदंग, गाथा, ज्ञानेश्वरी पूजन करून हजारो भाविकांनी जयजयकार करत पुष्पवृष्टी केली.तागडगावात हा नारळी सप्ताह होण्याची दुसरी वेळ असून यापूर्वी महंत भीमसिंह महाराज यांच्या हस्ते सन १९५६ मध्ये साजरा झाला होता. तागडगांव हे संत भगवानबाबांच्या मावशीचे गाव. याच गावात त्यांचे बालपण काही काळ गेले होते. त्याशिवाय पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचल्याचे सांगितले जात असल्याने या नारळी सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रेमाने बाबाच्या ऐश्वर्याला साजेसा असा सप्ताह साजरा करणार आहेत.सात दिवस आता तागडगावात हा भव्य दिव्य सप्ताह पाहण्यासाठी व अध्यात्मिक आनंद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी चोख नियोजन केले आहे. नूतन महंत अतुल महाराज शास्त्री हे देखील लक्ष ठेवून आहेत.सर्व राजकीय पुढाऱ्यांना एका रांगेत उभे करणारे एकच न्यायाचार्य असे सांगून ते सुध्दा उभेच राहिले, असे सांगत गडाप्रती असलेली भावना अगदी अल्प शब्दात माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही यावेळी संत भगवान बाबा यांच्याप्रती मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो भाविक येथे उपस्थित होते.नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले - प्रीतम मुंडेराजकीय भाषण करणार नाही. मी येथे नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले. मी श्रध्देपोटी आले आहे. संत भगवानबाबांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला होता. पशुहत्याही बंद केल्या. मुुलींचा, महिलांचा सन्मान हीच त्यांची शिकवण असल्याचे सांगून तुमच्या प्रेमाचा आम्हाला गर्व होऊ नये, असे मत खा. मुंडे यांनी व्यक्त केले. मात्र धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणणे टाळले.मी अध्यात्माचे नियम पाळणारा - धनंजय मुंडेअध्यात्माचे नियम पाळणारा मी असून, हे व्यासपीठ आशीर्वाद घेण्याचे आहे. राजकारण येऊ देऊ नका. आपला जिल्हा अध्यात्मिक क्षेत्रात आघाडीवर आहे. अध्यात्म जपणे आपले काम आहे. मनाच्या मंदिरात बाबांना ठेवा असे सांगून आम्हा बहीण- भावाला या व्यासपीठावर बोलावले, असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बंधू धर्म निभावला.बहीण - भाऊ अन् महंत एकाच मंचावरदसरा मेळाव्यादरम्यान भगवानगडावर राजकीय भाष्य करण्यासंदर्भात विरोध झाला होता. त्यानंतर मुंडे बंधू-भगिनी व महंत नामदेव शास्त्री यांच्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होत होती. गुरुवारी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने खा. डॉ. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री हे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रमात ते एकत्रित आल्याने दिवसभर चर्चेचा विषय होता.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMarathwadaमराठवाडा