शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:51 IST

पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे. 

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहता इतरत्र फिरणाऱ्या एस.पी. शेळके, पी.के. सानप हे हवालदार आणि डी.व्ही. चाटे या महिला शिपायाला गुरुवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी निलंबित केले. लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतानाही या पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु असताना भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिलेल्या घोषणापत्रात माहिती लपवल्याचा आक्षेप कॉँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांनी मतदार या नात्याने घेतला. मात्र, ते उमेदवार नसल्यामुळे त्यांचा आक्षेप फेटाळण्यात आला. त्यामुळे दादासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली आले असताना कार्यकर्त्यांच्या जमावाने त्यांना बुधवारी मारहाण केली होती. 

मारहाणीच्या वेळी होते गैरहजर घटना घडली त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे तिघेही कर्तव्यावर होते. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना बंदोबस्त दिला होता. बुधवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास  सुमारास येथे मारहाणीची घटना घडली. यावेळी हे तिघेही गैरहजर होते. त्यामुळे प्रकरण वाढले. पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनेचा आढावा घेतल्यानंतर हे तीनही कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे समोर आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या तिन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची चौकशीही सुरू केली आहे.

सर्वत्र तगडा बंदोबस्त  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवारी मारहाणीची घटना घडल्यानंतर गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. मुख्य प्रवेशद्वाराजवळ राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली होती. शिवाय परिसरातही ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त करून त्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी दिले होते.

मारहाणप्रकरणी एकाला अटकबीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कॉँग्रेस पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सायंकाळी शेख इरशाद नामक युवकास अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २५ जणांवर मारहाणीचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गुरुवारी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे व सपोनि दिलीप तेजनकर यांनी बालेपीर भागातून शेख इरशाद यास ताब्यात घेतले. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस हवालदार आणि एका महिला पोलीस शिपायाने गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केले आहे. - जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडcongressकाँग्रेसBJPभाजपा