शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये मुंडे विरुद्ध सोनवणे सरळ लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:29 IST

भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी केव्हाच निश्चित झाली होती, ती रविवारी जाहीर होऊन औपचारिकता पूर्ण केली.

ठळक मुद्देराष्ट्रवादीत अमरसिंह पंडित समर्थकांची नाराजीघटक पक्षातील विनायक मेटेंचा मुंडेना विरोध

- सतीश जोशी

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बजरंग सोनवणे हे रिंगणात उतरले आहेत. भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी केव्हाच निश्चित झाली होती, ती रविवारी जाहीर होऊन औपचारिकता पूर्ण केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनपेक्षितपणे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का बसला. ऐनवेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी नाकारली. 

गोपीनाथरावांच्या अपघाती मृत्यूमुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना मिळाला होता. तशी सहानुभूतीची लाट सध्या नाही. मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय राष्ट्रवादीतून निलंबित झालेले माजी मंत्री सुरेश धस यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेवर निवडून आणून भाजपने आपली ताकद आणखी वाढविली.

युतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे विनायक मेटे हे विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभूत झाल्यानंतरही भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन मराठा मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वर्चस्वाच्या लढाईत पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद विकोपाला गेला. राज्यात साथ, परंतु बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे काम करणार नसल्याचे शिवसंग्रामने जाहीर केले होते. देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी याची गंभीर दखल  घेत अशी ‘डबल भूमिका’ चालणार नसल्याचे बजावले. 

अमरसिंह पंडित समर्थकांची नाराजीबजरंग सोनवणे हे नवखे उमेदवार असून, त्यांचे राजकारण जिल्हा परिषदस्तरापर्यंत आहे. मुंदडा सोडले तर कुणाशीही त्यांचा टोकाचा वाद नाही, त्यांची हीच जमेची बाजू. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्क क्षेत्राबाहेर असून, दिवसेंदिवस त्यांचा भाजपशी घरोबा वाढत आहे. केज विधानसभा मतदारसंघातील नंदकिशोर मुंदडा आणि चिरंजीव अक्षय मुंदडा यांच्याशी सोनवणे यांचे कधीही जमले नाही. क्षीरसागर आणि मुंदडा यांच्या नाराजीचा फटका सोनवणे यांना बसू शकतो. अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत.

विनायक मेटेंचा विरोधपाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. बीडची जागा राष्ट्रावादीकडे असली तरी स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर वेळ पडेल तेव्हा खुलेआम भाजपला मदत करीत आहेत. राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपमध्ये घेऊन विधान परिषदेवर निवडून आणले आहे. त्यामुळे धस यांची मदत निश्चितच होणार आहे. या मुंडे यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा