शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Lok Sabha Election 2019 : क्षीरसागरांच्या बंडखोरीने बीड लोकसभेची लढत ठरतेय रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:57 IST

बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत लक्षवेधी लढत होत आहे.

ठळक मुद्देमुंडे बहीण-भावात आरोप-प्रत्यारोप ’शिवसंग्राम’चे विनायक मेटे प्रचारापासून दूरच

- सतीश जोशी

बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत लक्षवेधी लढत होत आहे.  भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यातच प्रमुख लढत होत असली, तरी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे  प्रा. विष्णू जाधव यांच्या उमेदवारीमुळे ही लढत कागदावर तरी तिरंगी झाली आहे. आंबेडकरांच्या रविवारच्या सभेची गर्दी लक्षवेधक होती. प्रा. जाधव हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारी मते कोणाच्या मताची वजाबाकी करतात, यावर इथल्या लढतीचा निकाल अवलंबून असेल. 

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावातील राजकीय वैर नवे नाही. उलट गेल्या काही वर्षांत त्यात कटुताच आली आहे. पंकजा यांच्या भगिनी डॉ. प्रीतम या नावालाच उमेदवार असून, त्यांची लढाई पंकजाच लढत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याबाबतीतही तेच. त्यांची लढाई धनंजय मुंडेच लढत आहेत. त्यामुळे पंकजाविरुद्ध धनंजय असेच या लढाईला स्वरूप आहे. मुंडे   बहीण-भाऊ एकमेकांच्या विरुद्ध काय बोलतात, हे ऐकण्यासाठीच भाजप, राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी होत आहे.  

पाडव्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी डॉ. प्रीतम मुंडेंना विजयी  करण्याचे आवाहन करून उघडपणे बंडखोरी केली. आजवर त्यांची भाजपसोबत छुपी युती होतीच. आता ते उघडपणे समोर आले आहेत. क्षीरसागरांच्या पाठिंब्यामुळे प्रीतम यांची बाजू भक्कम झाली असून, क्षीरसागर यांच्या  कार्यकर्त्यांनी कमळ हातात घेतल्याने लढतीत चुरस निर्माण झाली आहे.   

दुसरीकडे शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांनी भाजपचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपची चिंता वाढली आहे. मेटे समर्थक कोणाचा झेंडा हाती घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. मेटेंकडून दगफटका होऊ नये, म्हणून मेटेसमर्थक असलेल्या तीन जि. प. सदस्यांना फोडून त्यांना भाजपच्या प्रचारात गुंतविले आहे. 

कळीचे मुद्दे- भाजपसाठी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अपूर्ण काम, मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याकडे थकलेले शेतकऱ्यांचे एफ.आर.पी. पेमेंट - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक प्रमुख नेत्यांची बीड जिल्हा सहकारी बँकेची कर्ज थकबाकी प्रकरणे प्रचारात निघत आहेत.

प्रमुख उमेदवार : डॉ. प्रीतम मुंडे । भाजपबजरंग सोनवणे। रा.काँ.प्रा. विष्णू जाधव । वंचित बहुजन आघाडी 

तडजोड हेच भावाचे राजकारणआमच्या धनंजयभाऊने राष्ट्रवादीचे वाटोळे केले. १४च्या निवडणुकीत मुंडे साहेबांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. ज्यांनी चुलत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, ते कुणालाही सोडत नाहीत. ‘तडजोडी’ हीच माझ्या भावाच्या राजकारणाची स्टाईल आहे - डॉ. प्रीतम मुंडे, भाजपा

ऊसउत्पादकांची काळजी माझ्या ‘येडेश्वरी’ने उसाला २,२०० रुपये भाव दिला. मग आपल्या भगिनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याने केवळ १,४०० रुपयेच भाव का दिला? शेतकऱ्यांचे उर्वरित ३४ कोटी रुपये कुठे गेले? शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला ऊसउत्पादकांची काळजी आहे. भाजप उमेदवारास त्याचे देणे घेणे नाही.- बजरंग सोनवणे, रा.काँ.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा