शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुल होत नसल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:08 IST

हत्येनंतर पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याने ती मयत झाल्याचे पतीने नातेवाईकांना सांगितले.

ठळक मुद्देकेज तालुक्यातील वरपगावची घटना अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

अंबाजोगाई (बीड ) : लग्नानंतर आरोपीला दारूचे व्यसन जडल्याने पत्नीस माहेरहून खर्चासाठी पैसे घेऊन ये व तुला मुलबाळ कसे होत नाही, म्हणून त्रास देण्याचे काम सुरु होते. ११ जून २०१५ रोजी दुपारच्या दरम्यान आरोपीने पत्नी झोपली असताना तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रमन्यम यांनी आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

केज येथील प्रिया बबन इनकर हिचा विवाह तालुक्यातील वरपगाव येथील भीमराव भगवान बनसोड याच्यासोबत सन २०१२ मध्ये झाला होता. लग्नानंतर दोन वर्षे विवाहितेस चांगले नांदवले. भीमरावला दारू पिण्याचे व्यसन जडल्याने पत्नीस माहेरहून खर्चासाठी पैसे घेऊन ये म्हणून आणि तुला मुलबाळ कसे होत नाही म्हणत पत्नीस त्रास देण्यास सुरुवात केली. ११ जून २०१५ रोजी प्रिया दुपारी जेवण केल्यानंतर पलंगावर झोपली असता पतीने तिचा गळा दाबून खून केला. ही घटना दुपारी घडल्यामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत पती आत्महत्याचा बनाव करण्याची शक्कल लढवत होता. अखेर सायंकाळी ५ वाजता तिच्या माहेरच्या लोकांना प्रियाला हृदयविकाराचा झटका आल्याने ती मयत झाल्याचे सांगितले. माहेरच्या नातेवाईकांनी तत्काळ मुलीच्या घरी पोहचून मुलीच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसताच त्यांचा संशय बळावला.

या घटनेची माहिती नातेवाईकांनी केज पोलिसांना दिल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह केज ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन लाकाळ यांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात आरोपी पतीने सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याचा बनवा केला. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, मयत विवाहितेने गळफास घेतला असता तर त्या खोलीमध्ये ना दोरी आढळली, ना स्टूल आढळला. त्यामुळे पोलिसांना हा खून असल्याचे लक्षात आले.

खुनाचा कोणताही पुरावा आरोपीने सोडला नसल्याने पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र शवविच्छेदन अहवालात प्रियाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरु केली. परंतु तपासात आरोपी हा आत्महत्येचा बनाव करू लागला होता. शेवटी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ यांच्या न्यायालयात दाखल केले. न्या. अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.

यात मयताची आई उषा बबन ईनकर, मामा व मामी यांचा जवाब नोंदविला व केज येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केलेले डॉ. ए.जी. दहिफळे यांची साक्ष घेण्यात आली. यात डॉ. दहिफळे यांनी सदरील विवाहितेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे न्यायालयाला सांगितले. या प्रकारांत नेहमी बचावाची भूमिका घेणाऱ्या आरोपी पतीच्या विरोधात कुठलाही पुरावा व प्रत्यक्षदर्शी नसतानाही मयताची आई, मामा व डॉक्टरांच्या साक्षीवरूनच हा खून केल्याचे स्पष्ट झाल्याने न्या.  अनिल सुब्रमण्यम यांनी आरोपी भीमराव बनसोड यास जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयंचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. या प्रकरणात आरोपीने कुठलाही पुरावा नसताना पत्नीचा आत्महत्येचा व हृदयविकाराचा केलेल्या बनवाचे बिंग फुटले होते. पुरावा नसतानाही यात आरोपीला शिक्षा होते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. याचा तपास तत्कालीन पोनि नानासाहेब लाकाळ यांनी केला होता.

टॅग्स :MurderखूनArrestअटकCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप