सावरगाव शिवारात आढळला बिबट्या; शेतकर्‍यांत भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:27 PM2020-11-30T19:27:10+5:302020-11-30T19:27:39+5:30

याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनास दिली आहे.

Leopard found in Savargaon Shivara; An atmosphere of fear among the farmers | सावरगाव शिवारात आढळला बिबट्या; शेतकर्‍यांत भितीचे वातावरण

सावरगाव शिवारात आढळला बिबट्या; शेतकर्‍यांत भितीचे वातावरण

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले.

माजलगाव :  तालुक्यातील सावरगाव शिवारात सोमवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.

तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रोजच्या प्रमाणे  सोमवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी 1 वा. दरम्यान त्यांना अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत ग्रामस्थांना यांची माहिती दिली. यावर बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे , पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले. याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनास दिली आहे. यावरून तहसीलदार यांनी वनविभागाच्या अधिका-यांना कळवले आहे.

Web Title: Leopard found in Savargaon Shivara; An atmosphere of fear among the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.