शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:03 AM

पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली.

ठळक मुद्देगहाण जमिनीचा ताबा मागितला : शेतकऱ्याने नकार देताच केले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली.येथील राजगल्ली भागात राहणारे सय्यद सलीम सय्यद बाबामियां यांनी वैयक्तिक कारणासाठी खाजगी सावकार मच्छिंद्र यशवंत आतकरे याच्याकडून पाच टक्के व्याजाने ५ लाख १० हजार रुपये घेतले होते. यासाठी त्यांनी १८ सप्टेंबर २०१२ रोजी भाऊ सय्यद बशीर बाबामियां यांच्या नावाच्या ५ एकर जमिनीचे खरेदीखत करुन दिले होते. त्यानंतर चार वर्षात त्यांनी व्याजापोटी अंदाजे १२ लाख रुपये आतकरेला दिले आहेत. ५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९.१५ वाजता आतकरे सय्यद सलीम यांच्या घराकडे आला आणि तुमच्या शेतात जाऊ असे म्हणाला.नंतर दोघेही सय्यद सलीम यांच्या दुचाकीवरून जातेगाव रोडवरील दूध डेअरीजवळ आले. तिथे पूर्वीपासूनच दोन अनोळखी इसम थांबले होते. त्या ठिकाणी आतकरे याने सय्यद सामील यांच्याकडे आणखी एक व्याज दे अन्यथा तुझ्या जमिनीचा ताबा दे अशी मागणी केली. परंतु, यावर्षी दुष्काळ असल्याने व्याज देण्यास सय्यद सलीम यांनी असमर्थता दर्शविली. याचा राग आल्याने आतकरेने त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य दोघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तेवढ्यात याला जिवेच मारुत असे म्हणत मच्छिंद्र आतकरेने सोबत आणलेली विषाची बाटली काढली आणि ते विष सय्यद सलीम यांच्या तोंडात बळजबरीने ओतले. यावेळी सय्यद सलीम यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून रस्त्याने जाणारे काही व्यक्ती तिकडे येऊ लागल्याने आतकरे आणि सोबतचे दोघे तिथून निघून गेले.धावत आलेल्या लोकांनी सय्यद सलीम यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे त्यांनी गेवराई ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सावकार मच्छिंद्र आतकरे आणि अनोळखी दोघांवर गेवराई ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी