शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रोजगारासाठी गाव सोडले, पुण्यात येताच बीडच्या तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:17 IST

बीडच्या तरुणाची पुण्यात निर्घृण हत्या; डोक्यावर गंभीर जखम असून संपूर्ण शरीरावर देखील मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत.

दिंद्रुड (बीड): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथून रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब (बालाजी) मंचक लांडे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी ( दि. १७) पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत लांडे यास दाखल करून दोघांनी पळ काढल्याची माहिती आहे.

अधिक वृत्त असे की, बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील बाळासाहेब (बालाजी) मंचक लांडे (वय २३ वर्ष)हा रोजगाराच्या शोधात पुण्याला जात असल्याचे आईला सांगून १६ जानेवारीस निघाला होता. १७ जानेवारीच्या दुपारपासून त्याचा मोबाईल बंद होऊन तो बेपत्ता झाला. यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याच रात्री पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलला गंभीर जखमी अवस्थेतील बाळासाहेब यास उपचारासाठी दोघांनी दाखल करून पळ काढला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

संपूर्ण शरीरावर जखमायाप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. बाळासाहेब याच्या संपूर्ण अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. संत तुकारामनगर पोलीस ठाणे आणि सिटी क्राईम ब्रॅंचने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत बाळासाहेब यास रुग्णालयात दाखल करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. सोमवारी त्या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती असून अधिक तपास सुरु आहे.

ऑनलाइन तक्रारीवरून लागला शोधबाळासाहेब (बालाजी) लांडे शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा चुलत भाऊ परशुराम विलास लांडे हा पुण्यात त्याचा शोध घेत होता. दरम्यान, त्याने सोमवारी पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाईन मिसिंगची तक्रार दाखल केली. तासाभरात परशूराम यास पिंपरी चिंचवड क्राईम ब्रॅंचने संपर्क साधला. यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल येथे परभुराम यास बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड