शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:55 IST

धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

बीड : मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. मंत्रीपद भाड्याने दिल्याचे मी नव्हे, तर पंकजा मुंडे यांनीच तेव्हा भगवान भक्ती गडावरून असे भाष्य केले होते. मी तर आता म्हणलो आहे, असे म्हणत पंकजा यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली.

केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचे पडसाद अधिवेशनात उमटले. भाजपचे आ. सुरेश धस यांनी अंगावर शहारे आणणारा सर्व घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी दोन चौकशांचे आदेश दिले होते. अधिवेशन संपल्यानंतर धस आष्टीत आले. त्यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

विष्णू चाटे हा छोटा आका होता; परंतु मोठा आका याचादेखील हत्या प्रकरणात सहभाग आहे. तोच मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्यालादेखील आत लवकर आत टाकले पाहिजे. २०० पेक्षा जास्त कुटुंबे, व्यापारी हे गाव सोडून गेले आहेत. गायछाप, तंबाखू, चुन्याची एजन्सीही बळकावली. आता कोणाकडेही एजन्सी राहिली नाही, असे म्हणत परळीची अवस्था बिकट झाल्याचे आ. धस म्हणाले. परळीतील दुबे अपहरण प्रकरणातही आका असून, ते किती लाख रुपयांत मिटले हे मला माहिती आहे. ते लोक आपल्याला भेटायला येणार असल्याचेही आ. धस यांनी सांगितले.

‘काय होतास तू अन् काय झालास तू’धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. तुमच्या भरपूर चर्चा कानावर येत आहेत. ती माय माउली बीडमध्येच राहत असून रोज ओरडत आहे, असे म्हणत करुणा शर्मा यांचे नाव न घेता आ. धस यांनी आपल्याला सर्व माहिती असल्याचा इशारा दिला.

धसांनी कॉलर उडवलीमस्साजोग हे मराठा समाजाचे गाव आहे; परंतु लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे तेथून जात असताना याच संतोष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभेत तो भाजपचा बुथ प्रमुख होता. तो माझ्या पक्षाचा आहे म्हणून मी यात पडलो, असे म्हणत आ. धस यांनी कॉलर उडवत आपण कोणाला घाबरत नसल्याचेही सांगितले. धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून केलेल्या ‘असे प्रकार काय बीडमध्येच घडतात का’, या वक्तव्यावर धस यांनी आक्षेप नोंदविला. तुम्ही अप्रत्यक्ष याचे समर्थनच करत असल्याचे म्हणत मुंडेंवर निशाणा साधला.

टॅग्स :BeedबीडSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडे