शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जाँबाज श्वान ‘जॉनी’ला अखेरचा सलाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:00 IST

जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देबॉम्ब शोधक-नाशक पथकात होता समावेश : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; बंदुकीतून फैरी झाडत मानवंदना

बीड : जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.‘जॉनी’ या श्वानाचा जन्म २६ आॅक्टोबर २०११ रोजी झाला होता. त्यानंतर अवघ्या १ महिन्याचा असताना बीड पोलीस दलात सहभागी झाला होता. पुणे येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘जॉनी’ बीड पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकात कार्यरत झाला होता. विविध गुन्ह्यांचा शोध घेण्यात त्याचे मोठे योगदान होते. त्यामुळे विविध पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. २०१३ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात जॉनीने प्रथम पारितोषिक पटकावले. तर, २०१४ मध्ये हरियाणात झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातही त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २०१५ साली पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यात जॉनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितषिक मिळाले होते.दरम्यान, रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्याची अंत्ययात्रा निघाली. पार्थिव जीपमध्ये ठेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोरी ओढली व सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला. त्यानंतर पोलीस मुख्यालय मैदानावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून जॉनला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कार सावंत, स्वप्नील राठोड यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अल्पशा आजाराने झाले निधनपंढरपूर येथे होणाºया आषाढी आणि कार्तिकीवारीच्या दरम्यान मोठी गर्दी त्याठिकाणी असते. तसेच नागपूर येथे होणाºया विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, तुळजापूर येथील यात्रेदरम्यान व इतर गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधणे आदी बंदोबस्तात देखील ‘जॉनी’ने सहभाग नोंदवला होता. मागील काही दिवसांपासून तो आजारी होता. या अल्पशा आजारात जॉनीने रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसdogकुत्राDeathमृत्यू