माजलगाव : वडिलांच्या नावावरील शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना माजलगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील भुमापक एस.जी.राठोड यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी चार वाजता माजलगावच्या भुमिअभिलेख कार्यालयाच्या आवारात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.विशेष म्हणजे सकाळी तक्रार येताच बीडच्या एसीबीने तात्काळ सापळा लावला. दुपारी चार वाजता तर राठोड हे लाच स्विकारताना एसबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजानन जाधव, राकेश ठाकूर, मनोज गदळे, भारत गारदे, नदीम सय्यद आदींनी केली.
भूमापक कर्मचारी हजाराची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:50 IST