शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

ललिता साळवेंमुळे पोलीस दलात येणार नवीन नियम? खात्यांतर्गत वैद्यकीय तपासणीचे अधीक्षकांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:16 IST

 सोमनाथ खताळबीड : लिंगबदलाची परवानगी मागणा-या बीड पोलीस दलातील ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांकडून ललीताकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहिले ...

 सोमनाथ खताळ

बीड : लिंगबदलाची परवानगी मागणा-या बीड पोलीस दलातील ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांकडून ललीताकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहिले जात आहे. ललिता या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. त्यांनी लिंगबदल करण्यासाठी रजेचा अर्ज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. तेथून महासंचालकांकडे गेला. महासंचालक माथूर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.ललिता यांना लिंग बदल झाल्यानंतर पोलीस खात्यात पुरूष म्हणून कायम रहायचे आहे. परंतु असा नियम पोलीस विभागात नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आदेश महासंचालकांना दिले होते. त्यानुसार महासंचालक माथूर यांनी अधीक्षक जी. श्रीधर यांना एक पत्र पाठवून साळवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे उपअधीक्षक सावंत (गृह) हे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले असून ४ डिसेंबर रोजी तिची तपासणी करण्यासाठी वेळमिळाला आहे. या तपासणीत तिला किती वर्षांपासून हार्मोन्सचाबदल जाणवत आहे. ती शस्त्रक्रियेसाठी सक्षम आहे का? याबाबत अभिप्राय मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.अधीक्षकांची भेटलिंग बदलासाठी ललिता या मुंबईत मुक्कामी होत्या. मंगळवारी त्या बीडमध्ये आल्या असून त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेटही घेतली आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात त्यांना पुन्हा मुंबईला जावे लागणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश मिळाले आहेत.४ डिसेंबरला तपासणी केली जाईल. ही पहिलीच केस असल्याने आम्ही तिच्याकडे विशेष लक्ष देत आहोत. लिंग बदलानंतर तिला सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात अद्यापतरी नियम नाही. बाकी निर्णय वरिष्ठांच्या हाती आहेत.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCourtन्यायालय