शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 17:02 IST

गॉडफादर नसताना केवळ कलेच्या प्रती निष्ठा राखत आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड ) : मराठवाड्यातील माजलगाव तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येत बनवलेला 'लच्छी' लघुपट सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल' मध्ये अव्वल ठरला आहे. या लघुपटास मानाचा क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड मिळाला आहे. असंख्य अडथळ्यावर मात करीत माजलगाव सारख्या छोट्या शहरात राहून दिग्दर्शक ॲड.सतिष धुताडमल, लेखक आर. प्रकाश, कला दिग्दर्शक विष्णू उगले व निर्मिती व्यवस्थापक रंगा अडागळे यांनी 'पायपीट फिल्म्स् प्रोडक्शन' खाली सातत्याने वैविध्यपूर्ण लघुपटांची निर्मिती केलेली आहे. या क्षेत्रात गॉडफादर नसताना केवळ कलेच्या प्रती निष्ठा राखत आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

जानेवारी २०२२ मध्ये त्यांचा महत्त्वकांक्षी 'लच्छी' नावाचा मराठी लघुपट विविध फिल्म् फेस्टिवल्सला पाठविण्यात आला. गेल्या २० दिवसांपासून या फिल्मची देशातील विविध राज्यातील फिल्म फेस्टिवल्स स्पर्धेत निवड झाली, पारितोषिके देवून सन्मानही झाला. त्यांच्या या लघुपटाने 'आयकॉनीक शॉर्ट सीने ॲवार्ड '- २०२२ या फेस्टिवल्स मध्ये 'सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट' तसेच 'सर्वोत्कृष्ट विचार करायला लावणारा चित्रपट' हा किताब जिंकला आहे. तसेच 'चलचीत्र रोलींग अवार्डस्-२०२२' या फेस्टीवल मध्ये देखील 'बेस्ट क्रियेटिव आर्ट फिल्म' म्हणून 'लच्छी' ला सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच मानाच्या अशा सर्व भाषीक 'फिल्मशोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' (FIFF -2022) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतीम फेरिसाठी 'लच्छी' पात्र ठरला आहे. 

यासोबतच सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' या लघुपटाची निवड झाली. यानंतर अनेक टप्पे पार पाडत लघुपट अंतिम फेरीत दाखल झाला. येथे 'लच्छी' ला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसिद्ध फिल्म फेस्टीवलमध्ये जगभरातून आलेल्या लघुपटांसोबत स्पर्धा करत 'लच्छी' ने हे यश मिळवले आहे. यात स्नेहल मुळे, सौरभ धापसे, गणेश लोहार, सुरेखा डोंगरदिवे, स्मिता लिमगावकर, अन्नु पठाण, नितीन भागवत, सुरेश सुंबरे, भागवत माने व यश धुताडमल आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. तसेच तंत्रज्ञ म्हणून अमर देवणे आणि मयुर भिसे यांनी काम पाहीले. 'लच्छी' च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील या यशाबद्दल 'पायपीट फिल्म्स् प्रोडक्शन' च्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चित्रीकरण ते एडिटिंग माजलगावातच'लच्छी' या लघुपटात भटक्या विमुक्तांचे आयुष्य रेखाटण्यात आले आहे. याचे संपूर्ण चित्रण १२ दिवसात माजलगाव जवळील केसापुरी या छोट्याशा गावाशेजारी करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका चित्रीकरणादरम्यान संपूर्ण युनिटला बसला. मात्र, अडथळ्यांवर मात करत अखेर चित्रीकरण पूर्ण झाले. विशेष म्हणजे, त्यानंतरचे एडिटिंग आणि मिक्सिंग आदी तांत्रिक बाबी सुद्धा माजलगावातच करण्यात आल्या. 

दुर्लक्षित विषय हाताळत राहणार आगामी काळात उसतोड कामगार, ग्रामीण रस्ते यावर लघुपट निर्मिती करणार आहे. तसेच एका चित्रपटांची निर्मिती देखील आम्ही करणार आहोत. हे सर्व माजलगावात परिसरातच करणार आहोत.    - ॲड. सतिष धुताडमल, दिग्दर्शक

टॅग्स :MarathwadaमराठवाडाcinemaसिनेमाBeedबीड