शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'कुऱ्हाडीने वार करून पत्नीला संपवले'; पोलीस ठाण्यात आलेल्या पतीच्या कबुलीने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:08 IST

मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नव्हते

- मधुकर सिरसटकेज (बीड) : तालुक्यातील ढाकेफळ शिवारातील चौसा वस्तीवर पत्नीचा कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केल्यानंतर पती पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. आरती भगवान थोरात ( 25 ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती भगवान शाहूराव थोरात यास पोलिसांनी अटक केली आहे . 

भगवान शाहूराव थोरात हा आठवडी बाजारातून घरी आला. यावेळी  पत्नी आरती सोबत त्याचा वाद झाला. संतापलेल्या भगवानने पत्नी आरतीला खालीपाडून कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला. यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भगवान थोरात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. येथे ठाणे अंमलदारांना त्याने हत्येची माहिती दिली. 

त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपज़िल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. संतापाच्या भरात केलेल्या कृत्याने दोन मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत. 

मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावीआरती थोरात आणि भगवान थोरात यांना दोन लहान मुलं आहेत.ते प्राथमिक शाळेत होते. जालना जिल्ह्यातील नातेवाईकाच्या लग्नाला  भगवान थोरातची आई गेली होती. तर दिंद्रुड येथील एका नातेवाईकच्या कार्यक्रमाला वडील आणि भाऊ गेले होते. त्यामुळे पती, पत्नीतील वादाला सोडवायला कोणीच नसल्याने हा अनर्थ घडला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सर्व नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

गॅरेजवर गर्दी तरीही पती घरी भगवान थोरात याचे अंबाजोगाई महामार्गांवर केज येथे ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. आज बाजार दिवस असल्यामुळे गर्दी असतानाही तो दुपारीच गॅरेज बंद करून घरी गेला होता. त्यानंतर त्याने पत्नीचा खून केला. यावरून त्याने हा पुरवणीयोजित कट आखला होता का? या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी