ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 02:16 PM2021-11-02T14:16:02+5:302021-11-02T14:16:39+5:30

तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला

Kicking in the abdomen of a pregnant woman who refuses to cut the cane; Three-month-old infant cheated, husband and mother-in-law charged | ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

Next

अंबाजोगाई ( जि. बीड) : तीन महिन्यांची गर्भवती असल्याने विवाहितेने ऊसतोडणीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला बेदम मारहाण केली. यावेळी पतीने पोटात लाथा मारल्याने विवाहितेच्या पोटातील तीन महिन्यांचे अर्भक दगावले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी तांडा येथे घडली. याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कविता बालाजी पवार (वय २१, रा. कुरणवाडी तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या पीडित विवाहितेचे नाव आहे. एक वर्षापूर्वी तिचे लग्न बालाजी नामदेव पवार याच्यासोबत झाले. कविताच्या फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी तिला पती बालाजी आणि सासू सुमन यांनी ऊसतोडणीला सोबत चल म्हणून आग्रह धरला. परंतु, तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत कविताने ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला मारहाण सुरू केली.

पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वेदना
पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कविता एकटीच स्वाराती रुग्णालयात दाखल झाली. तपासणीअंती तिच्या पोटातील तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने ३० ऑक्टोबर राेजी ते मृत बाळ काढून टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून तिचा पती आणि सासूवर कलम ३१६, ३२३, ३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Kicking in the abdomen of a pregnant woman who refuses to cut the cane; Three-month-old infant cheated, husband and mother-in-law charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.