Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीड पोलिसांनी कोर्टात आरोप पत्र दाखल केले. यानंतर सोशल मीडियावर हत्येवेळी काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्यआरोपी असल्याचे म्हटले आहे. यानंतर राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली
आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले, बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होते का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
"फरार आरोपीला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामा देईपर्यंतचे सर्व कॉल डिटेल्स समोर आले पाहिजेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. धनंजय मुंडे यांचा पुरवणी जबाब घेणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहजे. ३०२ मध्ये अटक केली पाहजे, असंही जरांगे म्हणाले.
पाणी भरणाऱ्याकडे एवढ्या गाड्या कुठून आल्या?
"पाणी भरणाऱ्या जवळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत.बीएमडब्लू सारख्या गाड्या आहेत. हे कराड याचं नसावं हे मुंडे यांचं आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मुंडे यांनी कराड याचा बळी दिला. जेलमध्ये सडायची वेळ आली हे कराड याच्या कुटुंबाला देखील कळलं असेल. कराड याने कोर्टात सांगावं खून,खंडणी,गुंडगिरी हे सगळं मुंडे मुळे केलं असं सांगावं, जे खर आहे ते बोललं पाहजे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.