शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

करुणा शर्मा यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याची धमकी; परळीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:17 IST

परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळी (बीड): करुणा शर्मा यांनी फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून सोमवारी (दि. 23 ) रात्री पावणे अकराच्या सुमारास करूणा शर्माच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंदविण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की ,शहरातील पंचवटीनगर भागात राहणारे बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करुणा अशोक शर्मांच्या पोस्टवर कमेंट केली होती. त्यावरून, तु कमेंट का केली? असे विचारात बालाजी दहिफळे यांना करूणा शर्मा यांनी शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. करुणा शर्मांच्या अन्य एका सहकार्याने देखील  फोनवरून शिविगाळ केली, हा प्रकार 22 जानेवारी रोजी घडला आहे. याप्रकरणी 23 जानेवारी रोजी बालाजी ज्ञानोबा दहिफळे ( 36 , रा. पंचवटी नगर, परळी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून करुणा शर्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  परळी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी