कळंबच्या पेंटरचा मृतदेह आढळला केजमध्ये; घातपाताची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 06:45 PM2021-02-15T18:45:33+5:302021-02-15T18:46:27+5:30

Crime News हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा आहे.

Kalamb's painter's death body found in Kaij; Possibility of assassination | कळंबच्या पेंटरचा मृतदेह आढळला केजमध्ये; घातपाताची शक्यता 

कळंबच्या पेंटरचा मृतदेह आढळला केजमध्ये; घातपाताची शक्यता 

googlenewsNext
ठळक मुद्देमृतदेहाजवळील मोबाईलवरुन त्याची ओळख पटली

केज : केज कळंब रस्त्यालगतच्या गव्हाच्या शेतात 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा आहे. त्याचे नाव लखन महादेव सोनवणे असे आहे. युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केज- कळंब रस्त्यावरील साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांचे शेत आहेत. यात पेरूच्या बागे जवळ असलेल्या गव्हाच्या शेतात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. तुकाराम गुंठाळ हे सकाळी शेतात गेले असता त्यांना हे दृष्य दिसले. त्यांनी याची माहिती युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे व विजय आटोळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक पालवे आणि सीमा कोळी यांच्यासह बाळासाहेब ढाकणे, खनपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वैभव राऊत व पप्पू अहंकारे यांनी घटनास्थळी पाहणी केली. 

दरम्यान, मृतदेहाजवळील मोबाईलवरुन त्याची ओळख पटली आहे. हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा असून त्याचे नाव लखन महादेव सोनवणे असे आहे. तो इमारतींना रंग देण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रेताची व घटना स्थळाची माहिती घेतली असता त्याच्या डोक्यात मागील बाजूने मार लागलेला असून पाठीवर आणि मानेवर पुसटश्या मारहाणीच्या खुणा दिसून येत आहेत. तसेच कानातूनही रक्त आलेले होते. हा घात की अपघात ? याचा तपास पोलीस घेत आहेत.
 

Web Title: Kalamb's painter's death body found in Kaij; Possibility of assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.