शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

कारागृह नव्हे, कैद्यांचा कोंडवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:07 IST

बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा कारागृहातील वास्तव : क्षमता १६१ ची अन् कैदी ३०० पेक्षा जास्त, विस्तारासह मनुष्यबळ वाढीची गरज

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. येथे आठ बरॅक असून १६१ कैद्यांची (१४४ पुरूष व १७ महिला) क्षमता आहे. मात्र, सद्यस्थितीत आणि नेहमीच या कारागृहात ३०० च्या वर किंवा जवळपास कैदी असतात. त्यामुळे एका बरॅकमध्ये अक्षरश: कैद्यांना कोंबून ठेवण्याची वेळ येत आहे.बरॅकची रूंदीही कमी असल्याने येथील कैद्यांना राहणे देखील जिखरिचे बनले आहे. त्यामुळे झोपणे, राहणे, बसणे, मनोरंजन करणे आदी किरकोळ गोष्टींवरून कैद्यांमध्ये वाद होत असल्याचेही अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. त्यामुळे कारागृहाला नवीन इमारत व बरॅक वाढविण्यासंदर्भात शासन स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.दरम्यान, गुरुवारी पहाटे बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.बीड : जिल्हा कारागृहातील धक्कादायक वास्तव गुरूवारी समोर आले आहे. येथील कारागृहात कैद्यांची क्षमता केवळ १६१ एवढी आहे, प्रत्यक्षात मात्र येथे रोज ३०० च्या वर कैदी रहात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे कारागृह नसून कैद्यांचा कोडवाडा बनले आहे. विशेष म्हणजे कैद्यांवर नजर आणि बंदोबस्तासाठी येथील मनुष्यबळही खुपच अपुरे असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच जिल्हा कारागृह सध्या गंभीर समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे.कैदी वाढले, मनुष्यबळ मात्र तेवढेचकारागृहाची निर्मिती झाल्यापासून येथे १६१ कैद्यांना डोळ्यासमोर ठेवून ५३ अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले. सद्यस्थितीत कैद्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र अधिकारी, कर्मचारी आहे तेवढेच आहेत.त्यामुळे त्यांच्यावर बंदोबस्तासह कामाचा ताण वाढत आहे. जबाबदारी वाढल्याने आणि काही दुर्घटना घडल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा सुट्टया देखील रद्द केल्या आहेत.डॉक्टरची केली मागणीकारागृहात केवळ औषधनिर्मात्याचे पद भरलेले आहे. डॉक्टर देण्यासंदर्भात महानिरीक्षकांकडे पत्र पाठवून मागणी केलेली आहे. मात्र अनेक वर्षे झाले तरी ते अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे एखाद्या कैद्याला किरकोळ आजार झाला तरी त्याला जिल्हा रूग्णालयात पाठवावे लागते. अनेकवेळा गंभीर आजार असलेल्या कैद्यावर तात्काळ उपचार होत नाहीत.इतर कारागृहात कैद्यांचे स्थलांतरकिरकोळ गुन्हा करून आलेले कैदी जास्त वाद घालत नाहीत. मात्र कुख्यात, सराईत गुन्हेगार हे नेहमीच इतर कैद्यांना त्रास देतात. अशावेळी त्यांना न्यायालय आणि महानिरीक्षकांच्या परवानगीने इतर कारागृहात पाठविले जाते.यापूर्वी कल्याण कारागृहातून आलेल्या एका दरोडेखोराने इतर कैद्यांना मारण्याची धमकी दिली होती. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतही वाद घातले होते.त्याला तात्काळ सेंट्रल कारागृहात पाठविले होते. साधारण दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती.कारागृह अधीक्षकांचे पद रिक्तअगोदरच अपुरे मनुष्यबळ. त्यात कारागृह अधीक्षकांसह तुरूंगाधिकारी या दोन अधिकाऱ्यांसह हवालदाराचे पद रिक्त आहे. सध्या एम.एस.पवार यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. संजय कांबळे हे निरीक्षक त्यांना सहकार्य करतात.

टॅग्स :BeedबीडjailतुरुंगBeed policeबीड पोलीस