शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी डिग्रस, पोहनेर येथे आल्याने आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:07 IST

जायकवाडी धरणाचे पाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे.

परळी/सिरसाळा : जायकवाडी धरणाचेपाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे.तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या चार गावातून गोदावरी नदी जाते. पैठण येथील जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी ६.४५ वाजता परळी तालुक्यातील डिग्रस या गावी पोहचले आहे. यानंतर पोहनेरला दुपारी पाणी आले. तेलसमुख व बोरखेड या गावातून सोनपेठ तालुक्यातील विटा व गंगाखेडवरून नांदेडला जाते. यामुळे परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांचा आणि परिसरातील १५ ते २० गावांतील शेतीसाठीचा आणि पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. मागील २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते.गोदावरी नदी वरील बंधारा अपूर्ण ेतालुक्यातील पोहनेर येथील गोदावरीवरील बंधारा १५ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याचे संपूर्ण काम झालेले नाही. वास्तविक पाहता नाशिक ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत गोदावरीच्या पात्रात एकूण छोटे सरासरी १५ ते २० बंधारे २२००५ साली मंजूर करण्यात आले होते. त्यातील पोहनेर/तारगव्हाण हा एकमेव बंधारा अपुर्ण आहे.हा बंधारा झाला असता तर १५ हजार हेक्टरच्यावर जमीन सिंचनाखाली आली असती आणि ढालेगाव -पोहनेर २० किमी पाणी गोदावरीमध्ये अडले असते. पात्राच्या दोन्ही बाजूचे गाव मिळून परिसरातील ५० ते ६० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता, परंतु पाणी पोहनेरला येऊनही पुढे वाहून जाणार आहे, अशी कैफियत पोहनेरचे अ‍ॅड. रमेश साखरे यांनी मांडली. निधी नसल्याने हे काम अपूर्ण असल्याचे हिवरा गावचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण