शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

बीडच्या पोलीस आत्महत्या प्रकरणात जळगावातील तरुणी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:07 IST

तरुणी आणि तिचा प्रियकर बदनामीची धमकी देत असत

ठळक मुद्देसुसाईड नोटमध्ये तरुणीचा उल्लेख

जळगाव/बीड : बीड येथील दिलीप प्रकाश केंद्रे (३४) या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात जळगावातील पारो (नाव बदलले) या तरुणीला बुधवारी बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दिलीप केंद्रे या पोलिसाने मंगळवार स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पारो हिच्या नावाचा उल्लेख आहे. तिनेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार केंद्रे यांच्या पत्नीने दिल्याने तिच्यासह उमेश पाटील या दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी बीडचे पोलीस हवालदार कैलास ठोके, तुकाराम तांबोरे, विजय घोडके महिला पोलीस सौदरमल विद्या वैधाली यांचे पथक शहरात दाखल झाले.

रामानंद पोलीस ठाण्याचे रवींद्र पाटील, संतोष गीते, उज्ज्वला पाटील यांना सोबत घेत पथक पिप्राळा हुडको येथे गेले. पथकाने तेथून पारो हिला ताब्यात घेत रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद केली. त्यानंतर हे पथक बीडकडे रवाना झाले. याप्रकरणातील दुसरा आरोपी उमेश पाटील हा पोलीस शिपाई असल्यामुळे त्याची चौकशी होऊन त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. केंद्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची तपासणी पोलीस करीत आहेत.

केंद्रे पूर्वी रामानंदनगरला ड्यूटीलाकेंद्रे हे सन २०१० मध्ये जळगाव पोलीस दलात भरती झाले होते. रामानंदनगर पोलीस स्टेशनलाच त्यांची ड्यूटी होती. पिंप्राळा हा भाग रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने  ते पारोच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांची बदली बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली. यावेळी ते त्यांची पत्नी व ४ वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरातील स्वराज्यनगर भागात राहत होते. दरम्यान पारो व तिचा प्रियकर उमेश पाटील हे दोघे केंद्रे यांना बदनामी करेल अशी धमकी देत होते. तसे त्यांचा मानसिक छळ करत होते, पारो ही दिलीप यांना सतत कॉल करून आपले आळंदी येथे लग्न झाले आहे. त्यामुळे पत्नीशी फारकत घेऊन जळगावला ये, अन्यथा आपले सोबतचे फोटो, व्हीडिओ व्हायरल करेल. अशी धमकी देत असल्याने केंद्रे हे तणावात राहत होते.

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडPoliceपोलिस