शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीड जिल्ह्यात जेल भरो रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:40 IST

१ आॅगस्ट रोजी होणारे ‘जेल भरो’ आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलनाच्या परळी मुख्यालयातून समन्वयकांनी जाहीर केले आहे. मंगळवारी केज आणि पाटोदा तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतरुणांनो, टोकाचे पाऊल उचलू नका

बीड : जिल्ह्यात परळी येथे मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन १४ व्या दिवशीही सुरू होते. केज तालुक्यातील विडा येथे अभिजीत देशमुख नामक तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली आत्महत्या असून, तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन सर्वच पातळीवर केले जात आहे. दरम्यान, १ आॅगस्ट रोजी होणारे ‘जेल भरो’ आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलनाच्या परळी मुख्यालयातून समन्वयकांनी जाहीर केले आहे. मंगळवारी केज आणि पाटोदा तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

केज: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील विडा येथील उच्च शिक्षित युवकाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर विडा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. अभिजीत बालासाहेब देशमुख (वय३५) याचे एमएससी केमिस्ट्रीपर्यंत शिक्षण झाले होते. तो चार वर्षापासून प्रयत्न करुनही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो वडिलोपार्जित शेती व्यवसायाकडे वळला. मात्र शेतात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने त्याला शेतीसाठी बँकेचे ४० हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. शिक्षण घेऊनही केवळ आरक्षणाअभावी नोकरी मिळत नसल्याची सल होती. अखेर ३१ जुलैच्या पहाटे ५ वाजेण्याच्या सुमारास लिंंबाच्या झाडास गळफास घेऊन अभिजीतने जीवनयात्रा संपविली. अभिजीत याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘न झेपणारा औषध गोळ्यांचा खर्च व थकलेले बँकेचे कर्ज व मराठा आरक्षणामुळे मी जात आहे’ असा उल्लेख आहे आत्महत्येचे वृत्त समजताच विडा येथे बंद पाळण्यात आला.

ग्रामपंचायतची प्रशासनाकडे मागणीविडा ग्रामपंचायत व तेथील सकल मराठा समाजाने मयत अभिजीत हा मराठा आरक्षणाच्या मोर्चात सक्रिय राहिला आहे. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीत घ्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार अविनाश कांबळे, ना. तहसीलदार सचिन देशपांडे, मंडळ अधिकारी भागवत पवार आदींनी विडा येथे धाव घेतली.

दहा लाखांची मदतनोकरीचे आश्वासनजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मयताच्या नातेवाईकांस दहा लाख रुपये व एका व्यक्तीला सरकारी नोकरीत पात्रतेनुसार प्राधान्य किंवा संस्थेत नोकरीसाठी मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी स्वामी व तहसीलदार कांबळे यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला. मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुनिल धांडे, पृथ्वीराज साठे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, नंदकिशोर मुंदडा, रत्नाकर शिंदे, पिंटू ठोंबरे, राहुल गदळे आदींची उपस्थिती होती.पिंपळवाडी येथे दोन तास रास्ता रोकोपाटोदा : मंगळवारी तालुक्यातील पिंपळवंडी येथे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवली. तहसीलदार रूपा चित्रक यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनात ज्ञानेश्वर पवार, दादासाहेब पवार, अक्षय पवार, संजय गुजर, रमेश पवार, राहुल कापसे यांचेसह परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

आरक्षणाअभावी नोकरी नाही ; अभिजीतने मृत्यूला कवटाळले!केज : एमएस्सी केमिस्ट्री करुनही केवळ मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे माझ्या अभिजीतला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला अशी माहिती देताना वडील बालासाहेब देशमुख भावूक झाले. लोकमतशी बोलताना दिली त्यांना अश्रू अनावर झाले होते.विडा येथील बालासाहेब देशमुख यांना चार हेक्टर २७ गुंठे जमीन आहे. वयोमानामुळे ते आजारी असतात.घरची परिस्थिती हलाखीची असतानाही शेतात रक्ताचं पाणी करुन त्यांनी मुले अभिजीत व सचिन यांचे शिक्षण पूर्ण केले. अभिजीतने एमएस्सी केमिस्ट्री तर सचिनने बीएड पर्यंत शिक्षण घेतले. चार वर्षापासून नौकरीसाठी प्रयत्न केले मात्र नोकरीसाठी त्याच्याकडे आरक्षण नसल्यामुळे नौकरी मिळाली नाही. खाजगी कंपनीतही प्रयत्न केले. मात्र उच्च शिक्षित असतानाही नोकरी मिळू शकली नाही. आरक्षण नसल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बालासाहेब म्हणाले.

असहकार आंदोलन करासरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यापेक्षा बसमधून सामुदायिकपणे बिगर तिकिटाचा प्रवास करा. तिकीट काढु नका, बीजबील, नळपट्टी, पाणीपट्टी, सरकारी कर्ज, कोणताही शासकीय महसूल भरू नका, सरकारला असहकार्य करून वठणीवर आणा. आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका, लढा, सरकारला जेरीस आणा असे आवाहन पिंटु ठोंबरे यांनी यावेळी केले.

बीडमध्ये शनिवारी मराठा शिक्षक,प्राध्यापकांचा आरक्षणासाठी मोर्चाबीड : मराठा आरक्षणासाठी मराठा प्राध्यापक, शिक्षकांनी ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात फक्त शिक्षक आणि प्राध्यापक आपल्या गणवेशात सहभागी होणार आहेत.जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपली रितसर रजा टाकून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजीतच्या भावाला नोकरी देण्याचे आडसकर यांचे आश्वासनमयत अभिजीत देशमुख याचा भाऊ सचिन बालासाहेब देशमुख यास रमेश आडसकर हे त्यांच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरी देणार आहेत.यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी आडसकर यांनी केल्याची माहिती केज पंचायत समितीचे सभापती संदीप पाटील यांनीदिली आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडून देशमुख कुटुंबियाचे सांत्वनविडा येथील घटना समजताच पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने स्थानिक नेत्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी पाठवून देशमुख कुटूंबियाचे सांत्वन केले व धीर दिला. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना संपर्क साधून घटनेची अधिक माहिती जाणून घेतली. अभिजीतच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. देशमुख कुटूंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहे, त्याच्या कुटुंबियांना शासनातर्फे दहा लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून भावाला नोकरी देण्याची आपली भूमिका असल्याचे पालकमंत्री मुंडे म्हणाल्या. तरूणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहनही त्यांनी केले.

अमळाचा बरड येथे एक तास रास्तारोकोकेज : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी केज बीड राष्ट्रीय महामार्गावर अमळाचा बरडा येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील विडा,येवता, एकुरका, लिंबाचीवाडी, देवगाव, पिंपळगाव, दहिफळ वडमाऊली, देवगाव, लिंबाचीवाडी, पिंपळगाव, येवता,जोला, सासुरा,गौरवाडी, आंधळेवाडी, कोरडेवाडी, नांदुरफाटा, सारूळ येथील सकल मराठा समाजाचा सहभाग होता. यावेळी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, राजेभाऊ हराळे, चंद्रसेन मोरे , प्रकाश रोमण , विलास जोगदंड, अशोक भोसले उपस्थित होते. तहसीलदार अविनाश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे वाहनांची गर्दी झाली होती.

विडा गावात पोलिसांचा चोख बंदोबस्तविडा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अभिजीत देशमुख याच्या आत्महत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात भुजंग लक्ष्मण देशमुख यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे व जमादार मुकूंद ढाकणे करत आहेत.

टॅग्स :Beedबीडmarathaमराठा