शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जय महेश साखर कारखान्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:38 IST

ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : पैसे दिल्याशिवाय माघार घेणार नाही, साखरही अडविली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. पैसे मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखान्यातून बाहेर जाणारी साखरही अडविल्याने काहीवेळ गोंधळ उडाला होता.त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.पवारवाडी येथील जय महेश या खाजगी कारखान्याला मागील वर्षी शेतकºयांनी ऊस गाळपासाठी दिला होता. कारखाना प्रशानाने डिसेंबर २०१७ पर्यंतचे शेतकºयांना गाळप ऊसाचे पैसे दिले; परंतु जानेवारी २०१८ पासून शेतकºयांचे पैसे थकविले आहेत. दहा महिने होऊनही अद्याप शेतकºयांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऊस बिलाचे थकित पैसे तात्काळ देण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळावरपासून गेवराई, वडवणी, धारूर तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी कारखान्याच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. कारखान्याकडे पावणेदोन लाख क्विंटल साखर (जवळपास ५६ कोटी रुपयांची) शिल्लक असून ही साखर बाहेर नेण्यात येत आहे. यामुळे बुधवारी सकाळी कारखान्यातून बाहेर जाणारी साखर शेतकºयांनी अडविल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. यामुळे कारखानास्थळावर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखान्याकडे शेतकºयांचे जवळपास ४० कोटी रुपये थकले असून हे पैसे मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकºयांचे पैसे दिले नाही तर एकही साखरेची गाडी बाहेर जाऊ दिली जाणार नाही. हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिलाया आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम, कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे, राजू गायके, सुरेश काळे, रोहिदास चव्हाण, अर्जुन सोनवणे, अशोक मोरे, माजी सभापती भाजपचे नितीन नाइकनवरे यांनी सहभाग घेऊन आंदोलनाला पाठींबा दिला.शिवसेनेचेही पुण्यात झोपडी आंदोलन४जय महेश कारखान्याकडील उसबिलाचे थकित पैसे मिळावेत, या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारपासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर झोपडी थाटून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन