शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 18:48 IST

राम कथाकार हभप समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आल्या नंतर रामकथेला प्रारंभ झाला.

- मधुकर सिरसट केज (बीड) : येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचे संस्थापक वासुदेव खंदारे गुरुजी यांचे शिष्य समाधान महाराज शर्मा यांची सांगलीत रामकथा सुरु आहे. येथे भाविकांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. दरम्यान, गुरुवारी पुण्यात कीर्तनासाठी येण्यास उशीर होत असल्याने महाराजांसाठी आयोजकांनी चक्क हेलिकॉप्टर धाडले. महाराजांनी हेलिकॉप्टर प्रवास करत वेळेवर पोहचत वाघोली येथील महोत्सवात कीर्तन सादर केले. मात्र, हेलिकॉप्टर प्रवासामुळे समाधान महाराज शर्मा हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

केज तालुक्यातील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली परिसरातील सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवात ही कीर्तन सेवा सादर करण्याचा आग्रह भाविकांनी केला होता. परंतु सांगली येथील रामकथा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपली. त्यानंतर खाजगी वाहनाने 247 किमी अंतरावर वाघोली येथे जाण्यासाठी 5 तास 17 मिनिटे लागणार असल्यामुळे वेळेवर येणे  होणार नसल्याचा निरोपही महाराजांनी संयोजकांना दिला होता. परंतु वाघोली, पुणे येथील कीर्तन महोत्सवाचे  आयोजक संताराम कटके व मित्र परिवार भाविकांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आणि सांगली ते वाघोली हे अंतर अवघ्या 45 मिनिटात महाराजांनी पार केले. हेलिकॉप्टर मधून उतरताच महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.

भाविकांचा पुढाकारहभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनचा लाभ भाविकांना मिळावा यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजक शांताराम खटके, व  हरिदास जोगदंड, रोहीदास कटके, सोमनाथ कटके, सोमनाथ गावडे , गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेतला.

हत्तीवरून मिरवणूकसमाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आले. 

टॅग्स :BeedबीडPuneपुणे