शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'रात्र झाली, मुक्काम करा'; लेकीच्या सासरचे ऐकले असते तर वाचले असते पाच प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:23 IST

लेकीच्या सासरी कौटुंबिक वाद मिटवायला गेलेले आई-वडील-लेक अन् इतर दोघांचा मृत्यू

- संताेष स्वामीदिंद्रुड : पतीसोबत असलेला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आई-वडिलांना सिरसाळा येथे घेऊन गेलेल्या फरिदाचा देखील छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. रविवारी रात्री मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावरील तेलगाव ते नित्रुडदरम्यान झालेल्या अपघातात भाटवडगाव येथील फारूख चांद सय्यद व शबाना फारूख सय्यद आणि त्यांची मुलगी फरिदा अन्वर पठाण यांच्यासह रिक्षाचालक व त्याचा सहकारी असे पाच जण ठार झाले. 'रात्री उशीर झाला आहे, सकाळी जा', असे फरिदाच्या सासरच्या लोकांनी सुचविले होते. त्यांचे ऐकले असते आणि मुक्काम केला असता तर अपघाताचा काळ आणि वेळ आली नसती, अशी चर्चा सिरसाळा परिसरातील लोकांमध्ये ऐकायला मिळत होती.

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगावपासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथील फारूख चांद सय्यद व शबाना फारूख सय्यद हे मुलगी फरिदा हिचा पतीसोबत असलेला वाद मिटविण्यासाठी तिच्या तीन मुलांसमवेत सिरसाळा येथे रविवारी आले होते. दिवसभरात वाद मिटला नाही. त्यामुळे फरिदा व तिचे आई-वडील निघण्याच्या तयारीत असताना उशीर झाला आहे, रात्री मुक्काम करून सकाळी जाण्याबाबत सासरच्या लोकांनी सुचविले. परंतु ते थांबण्याच्या मानसिकतेत नव्हते.

रात्री १० वाजेच्या सुमारास फारुख सय्यद यांनी सिरसाळा येथील ऑटोरिक्षा भाड्याने घेतला. फरिदाची तीनही मुले सिरसाळा येथे सोडली. त्यानंतर ते मुलगी फरिदा व पत्नी शबाना यांच्यासोबत भाटवडगावकडे निघाले. पुढे नित्रुड-तेलगावदरम्यान काळाने घात केला. टेम्पो व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात फरिदाचे वडील फारुख सय्यद, आई शबाना सय्यद, ऑटोचालक नोहिद शेख व त्याच्यासोबतचा फैजान सय्यद या चौघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी फरिदा अन्वर पठाण हिला माजलगाव येथील खासगी रुग्णालय व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेदरम्यान तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सिरसाळा व भाटवडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात