शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
2
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
3
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
4
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
5
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
6
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
7
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
8
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
9
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
10
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
11
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
12
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
13
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
14
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
15
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
16
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
17
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
18
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
19
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
20
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

माजलगावात शासकीय केंद्रावरील खरेदीत अनियमितता; शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने केला पंचनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:55 PM

खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहुन कांही शेतकर्‍यांना यात शंका आल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला.

ठळक मुद्दे सुमारे 1200 शेतकर्‍यांनी आपल्या मुग,उडीद,सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्‍चात अद्याप एकाही शेतकर्‍याला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही

माजलगाव : शेतकर्‍यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकिय खरेदी सुरु करुन व्यापार्‍यांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड शुक्रवारी (दि. 16) झाला. शेतकऱ्यांना आक्षेपानंतर शासनाने महसुल व सहा. निबंधक यांच्या पथकाद्वारे केलेल्या पंचनाम्यातुन खरेदीत अनियमितता आदी बाबी उघड झाल्या. यावरून येथे मोठ्या प्रमाणावर काळा बाजार झाल्याचे किमान पंचनाम्यावरुन तरी निदर्शनास येत आहे. 

माजलगांव येथे शितल कृषि निविष्ठा सहकारी संस्था गिरवली या सहकारी संस्थेला मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नियुक्त केले आहे. खरेदीसाठी अधिकृतरित्या सदर संस्थेची नियुक्ती जरी शासनाने केली असली तरी येथील कांही पांढरपेशा नेत्यांनी या सहकारी संस्थेला हाताशी धरुन आर्थिक तडजोड करीत शेतकरी नोंदणीचे काम आपल्या हाती ठेवले. मागील 15 दिवसांपासून नोंदणीचे काम सुरु झाल्यानंतर सुमारे 1200 शेतकर्‍यांनी आपल्या मुग,उडीद,सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्‍चात अद्याप एकाही शेतकर्‍याला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही तसेच खरेदी केंद्र सुरु झाल्या बाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहुन कांही शेतकर्‍यांना यात शंका आल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सदर ठिकाणी मापे सुरु असुन शासकिय बारदाण्यात माल भरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांना माहिती न देता कोणाचा माल खरेदी केला

खरेदी केंद्र सुरु नसतांना कोणाचा माल अगोदरच खरेदी केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात होती. कारण या ठिकाणी एकाही शेतकर्‍याला माहिती, मोबाईल संदेश, टोकन इत्यादी कांहीच प्रक्रिया घडली नाही नाही मग हा माल आला कुठुन असाही प्रश्‍न उपस्थित झाल्याने शेतकरी संतापले आणि त्यांनी या सर्व छुप्या खरेदीचा पंचनामा प्रशासनाने करण्याची मागणी केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महसुल विभाग आणि सहा. निबंधक यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी पंचनामा केला.

खरेदीचे एकही कागदपत्र उपलब्ध नाही

पंचनाम्यातुन अनेक बाबी उघड झाल्या असुन  सदर सुरु असलेल्या खरेदी बाबतचा एकही दस्ताऐवज या ठिकाणी पथकाला आढळला नाही.  पथकातील अधिकार्‍यांनी परवानगी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे ही अंबाजोगाई येथील संस्थेच्या कार्यालयात असल्याचे सांगीतले तसेच शेतकरी नोंदणी , टोकन इत्यादी कसल्याही प्रकारचे अभिलेखे येथील संस्थेच्या उपस्थित असलेल्या  कर्मचार्‍याकडे आढळुन आली नाहीत त्यामुळे या पंचनाम्यावरुन तरी सदरील सर्वच कडधान्य खरेदी ही बोगस असल्याचे सिध्द होत असल्याने सदर संपुर्ण माल जप्त करुन शासनाने ताब्यात घेण्याची मागणी शेतकर्‍यांमधुन होत आहे. 

यामागचे गौडबंगाल काय?शासकिय खरेदीसाठी असमर्थता दाखवुन केवळ ऑनलाईनचे काम खरेदीविक्री संघाने आपल्याकडे घेतले ते कशासाठी याची उकल आता होत असुन व्यापार्‍यांनी सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत असतांना कमीभावाने खरेदी केलेला मुग, उडीद, सोयाबीन हा माल सर्वात अगोदर शासनाला खपवुन आपले उखळ पांढरे करण्यासाठी हा सर्व प्रताप घडवुन आणल्याचे निदर्शनास येत आहे. 

केंद्र बंद झाल्याने शेतकरी त्रस्त 15 दिवसांपासुन नोंद करुन ठेवलेल्या एकाही शेतकर्‍याचा छटाकभरही माल अजुन खरेदी केंद्रावर नाही त्यात काल घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची शास्वती नाही. त्यामुळे खरा शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे. आतातर ऑनलाईन नोंदणी देखील चालु नसल्यामुळे आता माल कोठे विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.  

आमदार देशमुखांनी घेतली दखलशासकिय खरेदी केंद्रावर पदाचा गैरफायदा घेवून शेतकर्‍यांच्या आडुन व्यापार्‍यांना फायदा पोहचविण्यात आला. पोंचविण्यासाठीच्या घडलेल्या प्रकाराची तक्रार ही पणन मंत्र्यांकडे आ.आर.टी. देशमुख करणार असल्याची माहिती भाजपाचे नितीन नाईकनवरे यांनी दिली.

अहवाल वरिष्ठांना पाठवला शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर सदरील केंद्राचा पंचनामा केला असता केंद्र चालकाकडे कसल्याही प्रकारचे अभिलेखे आढळुन आलेले नाहीत. त्यामुळे खरेदीचा कारभार हा अनागोंदी निदर्शनास येत असल्या बाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. - एल.टी. डावरे , सहकार अधिकारी सहा.निबंधक कार्यालय

टॅग्स :BeedबीडMarketबाजारState Governmentराज्य सरकार