शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 18:11 IST

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे.

Beed Police ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँवत यांची शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच आज रविवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. "शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी नीट पार पडणं, कायद्याचे राज्य प्रस्थापित करणं हे माझं ध्येय आहे. त्यामुळे शनिवार-रविवार असला म्हणून काही फरक पडत नाही. मी आता पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांचं म्हणणं मी ऐकून घेणार, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आणि लोकांची जी अपेक्षा आहे की जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे, त्यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करणार," असं म्हणत काँवत यांनी बीडला गुन्हेगारीमुक्त जिल्हा करणार असल्याचं म्हटलं आहे.

बीडचा बिहार झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न विचारताच नवनीत कावत म्हणाले की, "वैयक्तिकरीत्या मी या गोष्टीशी सहमत नाही. कारण मी मानतो की, हे दोन्ही भारताचेच भाग आहेत. माझं लक्ष्य आहे की, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली पाहिजे. लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल, यादृष्टीने काम केलं जाईल ," असं काँवत म्हणाले.

दरम्यान, "मी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नक्कीच मस्साजोग इथं जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेईन आणि त्यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल," असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे.

कोण आहेत नवनीत काँवत?

नवनीत काँवत हे २०१७ च्या आयपीएस बॅचचे आहेत. अधीक्षक म्हणून त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. कायदा व सुव्यवस्थेसह जिल्हा शांत ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. काँवत यांना सायबर क्राईममध्येही काम करण्याची आवड आहे. त्यामुळे सायबर ठाण्यातील प्रलंबित गुन्हे आणि तक्रारींचा निपटारा होण्यासह मदत होणार आहे. त्यांना खेळ खेळणे, गाणे, नृत्य करणे याचाही छंद आहे. मुळचे अलवरचे (राजस्थान) रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सैनिक स्कूल चित्तोडगड, राजस्थान येथे झाले. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, आयआयटीमध्येही पदवी घेतलेली आहे सम टोटल सिस्टम्स, हैदराबाद २०१२-२०१३ मध्ये सॉफ्टवेअर अभियंता, भारतीय रेल्वे २०१५- २०१६ मध्ये आयईएस अधिकारी, आयकर विभागात २०१६-२०१७ मध्ये आयआरएस अधिकारी म्हणून नोकरीचा अनुभव आहे. २०१७ साली ते आयपीएस झाले. लोणावळा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी, धाराशिवला अपर पोलिस अधीक्षक आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे काम समाधानकारक होते. त्यांनी क्यूआर कोडवर आधारित नागरिकांचा अभिप्राय आणि तक्रार नोंदवण्याची यंत्रणा सुरू केली आहे. तसेच डीसीपी कार्यालयात स्वतः तक्रारदाराशी २४ तासांत संपर्क करत होते.

बीडमधील आव्हान

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर अनेक घटना, घडामोडी जिल्ह्यात घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हेच सर्व मुद्दे आ. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासह इतर आमदारांनी उपस्थित केले होते. याच अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी लगेच नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली. काँवत हे छत्रपती संभाजीनगर शहरात झोन २ ला उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेथेही त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत. आता अधीक्षक म्हणून त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याला त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत. तसेच थेट आयपीएस आणि तरुण अधिकारी मिळाल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे गंदाराज ताल माफियांची दादागिरी संपुष्टात येईल, अशी आशा आहे. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeed policeबीड पोलीसBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे