शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आयफोनचा’ मोह महागात; १८ हजार गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:48 IST

अंबाजोगाई : अवघ्या १५ हजार रुपयात आयफोन देण्याच्या बहाण्याने येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.शहरातील आनंदनगरातील राहणाऱ्या सागर अशोक मोहिते या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने ई-बे या वेबसाईटवर आयफोन ६ एस अवघ्या १५ हजारात विक्रीस असल्याची जाहिरात पाहिली. त्याने वेबसाईटवरून ...

अंबाजोगाई : अवघ्या १५ हजार रुपयात आयफोन देण्याच्या बहाण्याने येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.

शहरातील आनंदनगरातील राहणाऱ्या सागर अशोक मोहिते या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने ई-बे या वेबसाईटवर आयफोन ६ एस अवघ्या १५ हजारात विक्रीस असल्याची जाहिरात पाहिली. त्याने वेबसाईटवरून विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक घेऊन थेट संपर्क केला. विक्रेत्याने सदरील वेबसाईटवर असलेली ही आॅफर बंद झाल्याचे सांगितले. तरीदेखील फोन पाहिजे असेल तर हायटेक सोल्युशन्स प्रा.लि. च्या पेटीएम वॉलेटमध्ये १५ हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार २२ मे रोजी सागरने १५ हजार रुपये सदरील कंपनीकडे जमा केले आणि त्यांना फोन लावला.

त्यांनतर दोन दिवसांत मोबाईल घरपोच मिळेल, असे सांगण्यात आले. २३ मे रोजी सागरला पुन्हा फोन आला आणि आणखी ३ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. सागरने नकार देताच त्यांनी ३ हजार जमा केले नाहीत तर आधीचे १५ हजार देखील परत मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने सागरने आणखी ३ हजार रुपये हायटेक सोल्युशन्सकडे जमा केले. त्यानंतर आणखी अठराशे रुपये पाठव, अशी सूचना सागरला केली.

त्यामुळे फसवणुकीची शक्यता वाटल्याने सागरने त्यांच्याकडे फोटो आयडीची मागणी केली असता विक्रेत्याकडून त्याला पंकज राजकुमार शर्मा (रा. नवी दिल्ली) या नावाचे आधार कार्ड दाखविण्यात आले. पैसे आणि मोबाईल मिळण्याची खात्री न वाटल्याने अखेर सागरने पेटीएमकडे याबाबत तक्रार केली. यावर पेटीएमकडून त्यास पोलिसात जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर सागरने अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पंकज राजकुमार शर्मा याच्यावर कलम ४१५, ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :BeedबीडMobileमोबाइलCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा