शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

सरपंच देशमुख हत्या व खंडणी प्रकरणी तपासाला गती; कराडची चौकशी, सुदर्शन घुलेसह तिघे ‘वाँटेड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 06:58 IST

सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी  उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली.    

बीड : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले, तर इकडे बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. त्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे.

सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी  उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली.    

धनंजय देशमुख यांना संरक्षणसरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एक पोलिस कर्मचारी संरक्षणासाठी दिला आहे. मी केजला शासकीय विश्रामगृह येथे एसआयटी पथक येणार असल्याने गुरुवारी गेलो होतो. परंतु अधिकारी आले नव्हते. म्हणून मी मस्साजोगला आलो, असे धनंजय यांनी सांगितले.

फरार आरोपींच्या नातेवाइकांची चौकशी : उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे सायंकाळी साडेसहा वाजता केज विश्रामगृहाबाहेर पडले. त्यांनी दिवसभरात फरार आरोपींच्या नातेवाइकांची चौकशी केल्याची माहिती आहे. तेली निघून गेल्यानंतर विश्रामगृहातून दोन पुरुष व पाच महिला, दोन लहान मुले बाहेर पडले. हे सर्व आरोपींचे नातेवाईक आहेत.

निकम यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चाआमदार धस यांनी निवेदन दिल्यानंतर मी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांच्याकडे असलेल्या इतर प्रकरणांचा आढावा घेऊन दोन दिवसांत निर्णय कळवतो, असे त्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आरोपीचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवाखुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वाँटेड म्हणून घोषित केले आहे. बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही दिला आहे.

योगायोग; कराड अन् पलंग सोबतच वाल्मीक कराड याला बीड शहर पाेलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी काही तासाने पाच पलंगही आणले. त्यातील चार पलंग हे बाहेर परिसरात तर एक पलंग हा ठाण्यात नेला. हा पलंग कराड याच्यासाठीच आणला, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, गुरुवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याचा खुलासा करत हे पलंग कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचे सांगितले.  

बीपी अन् शुगरच्या गोळ्या दिल्याकराड याला बीपी अन् शुगरचा त्रास आहे. पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला आता कोठडीतच गोळ्या पुरवल्या जात आहेत. गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही. 

‘एसआयटीतील चार अधिकाऱ्यांना हटवा’बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील खटल्याच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १० पोलिस अधिकाऱ्यांच्या एसआयटीतील चार अधिकाऱ्यांवर आमचा आणि संतोष देशमुख कुटुंबाचा संशय असून, त्यांना एसआयटीतून हटवावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आरोपींना बीडऐवजी छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक जेलमध्ये हलवावे, अशी मागणीही केली. धस यांनी गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या संदर्भातील निवेदन दिले.  

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस